bigg boss 19 neelam giri salman khan var naraj : रिअॅलिटी शो Bigg Boss 19 मध्ये वीकेंडचे भाग नेहमीच प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय ठरतात. या भागात होस्ट सलमान खान स्पर्धकांना त्यांच्या आठवडाभरातील वागणूक आणि कामगिरीवर भाष्य करतो. चांगली कामगिरी करणाऱ्यांचं कौतुक तर होतंच, पण चुकीचं वागणाऱ्या स्पर्धकांना सुनावणंही होते. मात्र यावेळी या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमानच्या काही प्रतिक्रियांमुळे नीलम गिरी visibly नाराज झाली.
शनिवारच्या भागात सलमान खाननं नीलम गिरीच्या जेवण न बनवण्याच्या मुद्द्यावर तिला दम दिला. त्याच वेळी इतर काही स्पर्धकांचं मात्र त्यानं कौतुक केलं. विशेषत: मृदुल तिवारी, गौरव खन्ना, अभिषेक बजाज, प्रणीत मोरे आणि अशनूर कौर यांच्या कामगिरीचा उल्लेख करत त्यांना सरळ कौतुकाचा वर्षाव केला. हे पाहून नीलमनं आपली भावना लपवली नाही.
नीलमनं तान्या मित्तलशी बोलताना नाराजी व्यक्त करत म्हटलं, “मी इतकं सगळं करते, घरातलं काम सांभाळते, तरी कधीच माझं कोणी कौतुक करत नाही. दुसऱ्यांनी काही छोटं काम केलं तरी लगेच गौरव केला जातो.” तान्यानंही तिच्या म्हणण्याला पाठिंबा देत सांगितलं की, “मीही काहीही केलं तरी लोक मला चुकीचं समजतात.”
नीलम पुढे म्हणाली, “सलमान सरांनी अभिषेकनं दोन दिवस जेवण बनवलं याचं कौतुक केलं. पण त्यांनी हे पाहिलंच नाही की मी तर सुरुवातीपासून हेच करतेय. आम्ही कितीही मेहनत केली तरी आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. हे खरंच खूप वाईट वाटतं.”
या घटनेदरम्यान सलमान खाननं बाहेरील टीकेलाही उत्तर दिलं. गेल्या काही दिवसांपासून अमाल मलिकची बाजू घेत असल्याचा आरोप सोशल मीडियावर होत होता. यावर तो म्हणाला, “मी अमालवर सर्वात जास्त टीका केली आहे. त्याला प्रत्येक वेळी सुनावलं आहे. त्यामुळे मी त्याची बाजू घेतोय असं समजणं चुकीचं आहे.”
हे पण वाचा..घटस्फोटानंतर अभिनेत्री लता सभरवाल यांची करवा चौथवरील भावनिक पोस्ट, महिलांसाठी दिला सकारात्मकतेचा संदेश
या सर्व घडामोडींमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. Bigg Boss 19 मध्ये घरातील स्पर्धकांमध्ये होणाऱ्या गटबाजीचा आणि कौतुकाचं असमान वाटप होत असल्याचा आरोप अनेक वेळा झाला आहे. नीलम गिरीची ही नाराजी त्यालाच अधोरेखित करते. आगामी एपिसोडमध्ये या विषयावर घरात आणखी वाद रंगण्याची शक्यता आहे.
bigg boss 19 neelam giri salman khan var naraj
Being A Baseer Fan I can Totally Understand Neelam , Hum Log Itna Din se Kiye uska koi Appreciation Nahi Very True.
— 𝘚αηу🍂 (@its_SanyHere) October 11, 2025
Ke ek ka khana Banana uska Weak Point Aur Dusre ka Khana Banana Masterstroke wow 👏#BiggBoss19 #BaseerAli #NeelamGiri #TanyaMittal pic.twitter.com/pVf4eThmcJ









