neha gadre mulga chehra dakhavla australia sthayik : अभिनय क्षेत्रात झळकलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेल्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री नेहा गद्रे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नेहाने तिच्या मुलाचा गोंडस चेहरा चाहत्यांना दाखवला असून, हा खास क्षण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेहाच्या चाहत्यांनी तिच्या या नव्या प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘अजूनही चांद रात आहे’ या मालिकांमधून आणि ‘मोकळा श्वास’ या चित्रपटातून प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झालेली नेहा गद्रे काही वर्षांपूर्वी अभिनयातून दूर झाली. वैयक्तिक आयुष्यात तिने २ मार्च २०१९ रोजी ईशान बापटशी लग्नगाठ बांधली आणि त्यानंतर पतीसह ती ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली.
गेल्या वर्षी नेहाने ऑस्ट्रेलियातील सुंदर समुद्रकिनाऱ्यावर बेबी बंपसह फोटोशूट करत आई होणार असल्याची आनंदाची बातमी शेअर केली होती. त्याचवेळी तिने बाळाच्या जेंडर रिव्हील सेरेमनीचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले होते. काही महिन्यांपूर्वीच तिच्या आयुष्यात गोंडस बाळाचं आगमन झालं असून १० फेब्रुवारीला मुलगा झाला होता. त्याचं नाव ‘इवान’ असं ठेवलं आहे.
अखेर बरोबर आठ महिन्यांनंतर अभिनेत्रीने तिच्या मुलाचा चेहरा चाहत्यांना दाखवला. “भेटा आमच्या छोट्या इवानला… आज आमचं बाळ ८ महिन्यांचं झालं,” असे भावनिक कॅप्शन देत तिने हा खास व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. हा क्षण पाहून तिच्या चाहत्यांसह मराठी सेलिब्रिटींनी देखील नेहावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अभिनय क्षेत्रातून दूर गेल्यानंतर नेहाने आपलं करिअर पूर्णपणे बदललं आहे. ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्यावर तिने ‘डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन अँड केअर’ ही पदवी पूर्ण केली आणि बालशिक्षण क्षेत्रात करिअर सुरू केलं. “एक दशक अभिनय केल्यानंतर पूर्णपणे वेगळ्या देशात जाऊन नवं करिअर उभारणं ही सोपी गोष्ट नव्हती. पण आज मी जिथे आहे त्याचा मला अभिमान वाटतो,” असं नेहाने एका पोस्टद्वारे सांगितलं होतं.
हे पण वाचा.. मी या इंडस्ट्रीत आलो ते माझ्या वहिनीमुळेच, अभिनेता हार्दिक जोशीच्या डोळ्यांत आलं पाणी Hardeek Joshi
आज ती एक प्रेमळ आई, पत्नी आणि नवी व्यावसायिक वाटचाल करणारी स्त्री म्हणून नवा अध्याय जगतेय. मराठी मनोरंजनविश्वातून दूर गेल्यावरही तिचा प्रत्येक क्षण चाहत्यांसाठी खास ठरत आहे. तिचा छोटा इवान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.









