ADVERTISEMENT

पारू मालिकेत मोठा ट्विस्ट; अहिल्यासमोर येणार पारू आणि आदित्य, पुढे काय होणार?

Paaru maliket nava twist ahilyasamor paaru aani aditya : पारू मालिकेत आता कथानकाला नवं वळण मिळणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये पारू आणि आदित्य अहिल्यासमोर येताना दिसत आहेत. या क्षणानंतर मालिकेत काय घडतं हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
Paaru maliket nava twist ahilyasamor paaru aani aditya

Paaru maliket nava twist ahilyasamor paaru aani aditya : पारू ही मालिकेची कथा सध्या प्रेक्षकांच्या मनात वेगळीच जागा निर्माण करत आहे. दरवेळी काहीतरी नवं घडवत प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या मालिकेत आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये पारू आणि आदित्य थेट अहिल्या यांच्यासमोर येताना दिसत आहेत. त्यामुळे मालिकेतील पुढील भागाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

किर्लोस्कर कुटुंबातून बाहेर पडल्यापासून पारू आणि आदित्य एका चाळीत राहतात. अहिल्या यांनी त्यांना घरातून बाहेर काढल्यापासून दोघांचे जीवन पूर्णपणे बदलते. रोजीरोटी मिळवण्यासाठी पारूला स्वयंपाकाचं काम मिळालं असून ती नवीन आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असते. पण नियतीने काही वेगळंच ठरवलं असतं. ज्या ठिकाणी पारूला काम मिळतं, तिथेच अहिल्या आणि किर्लोस्कर कुटुंब यांना जेवणासाठी निमंत्रित करण्यात आलं असतं. पारूला याची काहीच कल्पना नसते.

आपली ओळख लपवण्यासाठी पारू मास्क लावून सगळ्यांसमोर जेवण सर्व्ह करत असते. तिच्या हातचं जेवण अहिल्या आणि सगळ्यांनाच खूप आवडतं. जेवणाचं कौतुक करत अहिल्या तिला सोन्याची बांगडी बक्षीस देतात. याच क्षणी त्या पारूला मास्क काढायला सांगतात. पारूचा चेहरा दिसताच सगळ्यांना धक्का बसतो. अहिल्या यांचा चेहरा रागाने लाल झाल्यासारखा दिसतो आणि वातावरण तणावग्रस्त होतं.

तिथे उपस्थित असलेली एक बाई म्हणते, “हीच ना तुझ्या कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर?” यावर अहिल्या प्रत्युत्तर देतात, “होती… आता आमचं तिच्याशी काहीही नातं नाही.” या एका संवादाने सगळं वातावरण भारलेलं दिसतं.

याच वेळी आदित्य तिथे बुकेची डिलिव्हरी करण्यासाठी पोहोचतो. पण त्याच्याशी गैरवर्तन केलं जातं, त्याला धक्का दिला जातो. तेव्हा अहिल्या तिथे येतात आणि आदित्य त्यांना “आई” म्हणून हाक मारतो. मुलाचा असा अपमान झालेला पाहून अहिल्यांचा चेहरा पांढरा पडतो. पुढे त्या नेमकं काय निर्णय घेणार, याकडे प्रेक्षकांचे डोळे लागले आहेत.

हे पण वाचा.. ‘दुभाजकाला गाडी धडकली अन्…’; प्रियदर्शिनी इंदलकरचा भीषण अपघात — मृत्यूच्या दारातून परतली अभिनेत्री

या प्रोमोमुळे मालिकेत आणखी तणाव निर्माण होणार असून पारू आणि अहिल्या यांच्या नात्याची दिशा काय वळण घेईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘पारू’ मालिकेच्या आगामी भागात भावनिक वळण मिळणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

हे पण वाचा.. नवरी मिळे हिटलरला’ मालिका बंद झाल्याचं ऐकून वल्लरी विराज सुन्न; म्हणाली, “पहिलीच मालिका असल्याने वेगळं नातं जडलं होतं”

Paaru maliket nava twist ahilyasamor paaru aani aditya