ADVERTISEMENT

‘ठरलं तर मग’ मध्ये प्रियाच्या खऱ्या आई-बाबांची एन्ट्री; अर्जुनच्या गैरसमजातून मालिकेत रंगणार नवा ट्विस्ट!

tharala tar mag priya chi khare aai baba twist maliket : ‘ठरलं तर मग’ मालिकेत आता प्रेक्षकांसमोर उलगडणार मोठं रहस्य! अर्जुनचा गैरसमज आणि प्रियाच्या भूतकाळामुळे सुभेदार कुटुंबात निर्माण होणार तणावाचं वातावरण. पुढे काय घडतंय याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
tharala tar mag priya chi khare aai baba twist maliket

tharala tar mag priya chi khare aai baba twist maliket : मराठी मनोरंजन क्षेत्रात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली मालिका म्हणजे ठरलं तर मग. या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटना प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा कळस गाठत आहेत. सायलीच्या भूतकाळाशी निगडित गूढ आणि प्रियाच्या आयुष्यातील सत्य यामुळे सुभेदार कुटुंबात नवा गोंधळ माजणार असल्याचं स्पष्ट दिसतंय. या सर्व घडामोडींमागे अर्जुनचा झालेला मोठा गैरसमज केंद्रस्थानी आहे.

कथानकात सध्या अर्जुन आपल्या पत्नीच्या म्हणजेच सायलीच्या खऱ्या आई-वडिलांचा शोध घेत आहे. सायली ही रविराज किल्लेदार यांची मुलगी असल्याचं गुपित मधुभाऊंना समजतं. पण, नागराजच्या हल्ल्यात ते गंभीर जखमी होऊन कोमात जातात. कोमात जाण्यापूर्वीच मधुभाऊ अर्जुनला एक मोठा इशारा देतात – सायलीचे पालक अजूनही जिवंत आहेत. याच हिंटमुळे अर्जुन तिच्या आई-वडिलांचा शोध घेण्याचा निर्धार करतो.

दुसरीकडे, प्रियाचं आयुष्य आणि तिचा भूतकाळ सुद्धा हळूहळू उलगडू लागतो. प्रिया साध्या कुटुंबातील मुलगी असते. तिचे आई-बाबा टेलरिंगच्या कामावर घर चालवतात. या वास्तवाला लपवण्यासाठी ती आतापर्यंत खूप प्रयत्न करत आली आहे. कारण, सायलीची खरी ओळख स्वतःसाठी स्वीकारून ती उच्च समाजात आपलं स्थान निर्माण करू पाहत असते.

कथेतला मोठा टर्निंग पॉईंट तेव्हा येतो, जेव्हा अर्जुन प्रियाचे पालक सदाशिव आणि श्रद्धा लोखंडे यांनाच सायलीचे खरे आई-वडील समजतो. हा गैरसमज एवढा गंभीर होतो की तो दोघांना सुभेदारांच्या घरी घेऊनही येतो आणि सर्वांसमोर अभिमानाने जाहीर करतो की हेच सायलीचे खरे पालक आहेत. अर्जुनचा हा निर्णय सायलीसाठी मोठा धक्का असतो, तर प्रियासाठी ही भीतीचं कारण ठरते. कारण, सदाशिव आणि श्रद्धा यांच्यासमोर तिचं नाटक कोसळू शकतं.

आता सायली या दोघांना आपले आई-वडील म्हणून स्वीकारते का? तिला भूतकाळ आठवतो का? आणि प्रिया आपली ओळख लपवू शकते का? या सगळ्याची उत्तरं प्रेक्षकांना आगामी भागांत मिळणार आहेत. १३ ते १५ ऑक्टोबरच्या भागांमध्ये हा सगळा ट्विस्ट उलगडणार असून प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

हे पण वाचा.. भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामा ची साथ, मालिकेत नवं वळण

सोशल मीडियावर प्रेक्षक या ट्रॅकबद्दल विविध अंदाज वर्तवताना दिसत आहेत. काही नेटकरी प्रियाच तिच्या आईसोबत हातमिळवणी करून हे नाटक पुढे नेईल आणि सुभेदारांना फसवेल, असा दावा करत आहेत. त्यामुळे आता Tharala Tar Mag मध्ये पुढे काय घडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मालिकेतील हा रहस्यमय वळण प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवणार आहे.

हे पण वाचा.. सैराट फेम तानाजी गळगुंडेच्या घरी बाळाचं आगमन; पहिली झलक सोशल मीडियावर

tharala tar mag priya chi khare aai baba twist maliket