ADVERTISEMENT

मराठी गायिका आनंदी जोशीला डॉक्टरकडून अश्लील मेसेज; सोशल मीडियावर शेअर केला धक्कादायक अनुभव

aanandi joshi ashlil massage Doctor chahta : मराठीतील प्रसिद्ध गायिका आनंदी जोशीला एका डॉक्टर चाहत्याने अश्लील मेसेज पाठवल्याने संतापाची लाट पसरली आहे. आनंदीने स्वतः सोशल मीडियावर हा प्रसंग सांगत महिलांवरील अपमानास्पद वर्तनाविरोधात आवाज उठवला आहे.
aanandi joshi ashlil massage Doctor chahta

aanandi joshi ashlil massage Doctor chahta : मराठी संगीत क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आनंदी जोशी सध्या एका अप्रिय घटनेमुळे चर्चेत आहे. आनंदीला सोशल मीडियावर एका डॉक्टर चाहत्याने अश्लील मेसेज पाठवल्याने संताप आणि धक्का बसला आहे. विशेष म्हणजे ज्याने आधी तिचं गायन आणि व्यक्तिमत्त्वाचं कौतुक केलं, त्याच व्यक्तीने नंतर अत्यंत असभ्य टिप्पणी केली. हा संपूर्ण प्रकार स्वतः आनंदीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

गायिकेने सांगितले की संबंधित व्यक्तीने पाठवलेला मेसेज मूळतः त्याच्या मित्राला पाठवायचा होता. मात्र चुकीने तो थेट आनंदीपर्यंत पोहोचला. या प्रकारानंतर आनंदीने शांत न राहता त्या व्यक्तीला सरळ “तू चुकून मला मेसेज पाठवलास” असं सांगितलं. त्यानंतर त्याने तो मेसेज डिलीट केला, पण जे घडलं त्याचा परिणाम मात्र गायकावर झाला.

आनंदीने पुढे सांगितलं, “बरं झालं हा प्रकार माझ्यासोबत घडला, कारण त्यामुळे मला समजलं की ती व्यक्ती माझ्याबद्दल नेमकं काय विचार करते. त्याचं उद्दीष्ट स्पष्ट झालं. मला धक्का फक्त त्याच्या मेसेजमुळे नाही बसला… तर तो पेशाने एक बालरोगतज्ञ आहे यामुळे बसला. अशा व्यक्तीकडे लहान मुलांची जबाबदारी असते, त्यांना स्पर्श करून तपासणी करण्याचा अधिकार असतो. आणि हीच गोष्ट अधिक भयानक वाटते.”

गायिकेने हेही स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या वागणुकीकडे दुर्लक्ष केल्यास समाजात चुकीचा संदेश जातो. “जर आपण गप्प बसलो, तर त्यांना वाटतं की त्यांचं वागणं योग्य आहे. अशा लोकांमध्ये महिला, मुले आणि प्राण्यांविरुद्ध गुन्हे करण्याची क्षमता असते. आपण त्यांची ओळख करून दिल्यास संभाव्य धोका टाळता येतो,” असं ती म्हणाली.

सोशल मीडियावर आनंदी जोशीच्या या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या धैर्याचं कौतुक केलं आणि महिलांनी अशा प्रसंगी आवाज उठवणं किती महत्त्वाचं आहे हे अधोरेखित केलं. या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे की प्रसिद्ध व्यक्तींनाही ऑनलाइन छळाचा सामना करावा लागतो आणि त्यावर ठामपणे आवाज उठवणं गरजेचं आहे.

हे पण वाचा..आदिश वैद्यने सांगितल’आई आणि बाबा रिटायर’ सोडण्यामागचे खरे कारण

या प्रसंगानंतर आनंदी जोशीने कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याबाबत अद्याप स्पष्ट वक्तव्य केलं नसून, तिने या घटनेचा उपयोग समाजातील वास्तव दाखवण्यासाठी केला आहे. तिच्या या भूमिकेला नेटिझन्सकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.

हे पण वाचा..२५ वर्षांनंतर मूळ गावी परतली शुबांगी अत्रे; कुटुंबासोबतच्या खास क्षणांची केली शेअरिंग

aanandi joshi ashlil massage Doctor chahta