ADVERTISEMENT

भारती सिंगची गुडन्यूज व्हायरल! सिद्धार्थ जाधवची पोस्ट झाली चर्चेचा विषय

bharati sing pragnancy siddharth jadhav post : कॉमेडीच्या दुनियेत ‘लाफ्टर क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी भारती सिंग पुन्हा एकदा आई होणार असल्याची गोड बातमी समोर आली आहे. ही गुडन्यूज समजताच अभिनेता सिद्धार्थ जाधवसह अनेक सेलिब्रिटींनी भारती आणि हर्ष लिंबाचियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
bharati sing pragnancy siddharth jadhav post

bharati sing pragnancy siddharth jadhav post : कॉमेडीच्या जगतात आपल्या बेधडक स्टाइलमुळे घराघरात पोहोचलेली भारती सिंग पुन्हा एकदा मातृत्वाचा आनंद अनुभवणार आहे. सोशल मीडियावरून भारतीने स्वतः ही आनंदवार्ता चाहत्यांसमोर आणताच शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमधील कॅप्शनमध्ये तिने आनंदाने लिहिले, “आम्ही पुन्हा एकदा प्रेग्नंट आहोत.” या खास पोस्टसोबत भारतीने हर्षसोबतचा एक गोंडस फोटो शेअर केला असून तिचा बेबी बंपही त्यात स्पष्ट दिसत आहे.

या गुडन्यूजने केवळ चाहत्यांचाच नव्हे तर संपूर्ण मनोरंजन विश्वाचाही आनंद द्विगुणित केला आहे. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव यानेही भारती आणि हर्षसाठी एक खास पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये भारती आणि हर्षचा फोटो पोस्ट करत त्याने लिहिले – “अपून फिरसे मामा बनेगा… भारती आणि हर्ष, तुमचं हार्दिक अभिनंदन!” त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा ओघ सुरू आहे.

भारती आणि हर्ष लिंबाचियाचं लग्न २०१७ साली पार पडलं होतं. ३ एप्रिल २०२२ रोजी त्यांच्या घरी मुलगा झाला आणि त्याचं नाव लक्ष्य ठेवलं गेलं. मात्र सगळेच त्याला प्रेमाने “गोला” या नावाने हाक मारतात. छोटा गोला आज सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. आता या जोडप्याच्या आयुष्यात दुसऱ्या अपत्याचं आगमन होणार असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून भारतीला शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला आहे. भारती सिंग ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय महिला कॉमेडियनपैकी एक आहे. तिच्या विनोदी स्वभावामुळे ती लाखो प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. हर्ष आणि भारती यांचं नातंही प्रेक्षकांसमोर नेहमीच खुलं आणि गोडपणाने भरलेलं राहिलं आहे.

हे पण वाचा.. माझं सर्वात मोठं दुःख आहे की मला..” निवेदिता सराफ यांनी मनातील खंत पहिल्यांदाच केली व्यक्त Nivedita Saraf

आता पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात नव्या सदस्याचं स्वागत होणार आहे. चाहत्यांना त्यांच्या छोट्या कुटुंबाचा हा नवीन टप्पा पाहण्याची आतुरता लागली आहे. भारतीच्या या गुडन्यूजने सोशल मीडियावर आनंदाची लाट उसळली आहे आणि Siddharth Jadhav च्या पोस्टमुळे हा आनंद अधिकच रंगतदार झाला आहे.

हे पण वाचा.. बिग बॉस १९ मधील नवीन वाइल्ड कार्ड मालती चहरची बालपणापासूनचे संघर्ष आणि धाडस

bharati sing pragnancy siddharth jadhav post