ADVERTISEMENT

मुरांबा मालिकेत अक्षय-रमाचा दुरावा; नवीन प्रोमोने वाढवली उत्कंठा

muramba aksay rama durava navin promo : 'मुरांबा' मालिकेत अक्षय आणि रमाच्या नात्यातील ताण अजूनही कायम आहे. नवीन प्रोमोमध्ये त्यांच्या भांडणातून आणि गैरसमजातून निर्माण होणाऱ्या कथानकाची झलक पाहायला मिळते.
muramba aksay rama durava navin promo

muramba aksay rama durava navin promo : स्टार प्रवाह वाहिनीवर नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रोमोमध्ये रमा आणि अक्षय यांच्यातील ताण, भांडणे आणि गैरसमज पुन्हा एकदा दिसून येतात. सात वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या या जोडप्याच्या नात्यातील गुंतागुंत प्रोमोमध्ये स्पष्ट दिसते.

प्रोमोमध्ये मुलगी आरोही दोघांना एकमेकांच्या आयुष्यात पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. ती अक्षय-रमाच्या जवळ येण्याचा मार्ग शोधत असतानाच, रमा चोराच्या मागे धावते. “माझी पर्स, चोर-चोर” असे ओरडताना ती दिसते. यावेळी अक्षय देखील धावत येतो आणि चोराचा पाठलाग करतो.

थोड्याच वेळात चोर आणि अक्षय यांच्यात शारिरीक संघर्ष घडतो. चोर खिशातून चाकू काढतो आणि अक्षयच्या हातावर वार करतो. रमा त्याला म्हणते, “अहो पर्स जाऊ द्यायची ना, ती काय तुमच्या जीवापेक्षा महत्त्वाची आहे का?” त्यानंतर ती अक्षयच्या जखमेवर कपडा बांधते. मात्र, अक्षय रागाने तिच्या हातातून त्याचा हात काढतो आणि म्हणतो, “सोडा, बास झाली ही नाटकं. असं खोटं वागण्याची काही गरज नाही. एवढी काळजी वाटत होती तर घर सोडून जायचं नाही.”

या प्रसंगानंतर रमा म्हणते, “थांबवायच तेव्हा,” त्यावर अक्षय पुन्हा म्हणतो, “मी काय तुम्हाला थांबवणार? तुमच्यापुढे हात जोडतो. आयुष्यातून निघून गेला होता ना? पुन्हा का त्रास देताय? आधीच खूप जखमा दिल्या आहेत. त्या जखमा एकवेळ सहन करेन, पण खोटी मलमपट्टी नको.” या संवादातून त्यांच्या नात्यातील ताण अधिक स्पष्ट होतो आणि प्रेक्षकांच्या उत्सुकता वाढते.

स्टार प्रवाह वाहिनीने या प्रोमोला शेअर करताना कॅप्शन दिलं आहे, “अक्षयच्या अशा बोलण्यामुळे रमा-अक्षयमधला दुरावा आणखी वाढेल का?” मालिकेतील पुढील कथानक प्रेक्षकांसाठी रोमांचक ठरणार आहे. आता प्रश्न फक्त इतकाच राहतो की, रमा आणि अक्षय यांच्यातील गैरसमज कधी दूर होतील आणि इरावतीचा खरा हेतू प्रकट होईल की नाही.

हे पण वाचा.. घरोघरी मातीच्या चुली: ऐश्वर्याने उभ्या केलेल्या संकटातून जानकी कुटुंबाला कसं वाचवणार? प्रोमोमुळे वाढली प्रेक्षकांची उत्सुकता

‘मुरांबा’ मालिकेच्या चाहत्यांसाठी हा प्रोमो एकदा पाहणे आवश्यक ठरत आहे, कारण या मालिकेतील प्रत्येक ट्विस्ट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो आणि अक्षय-रमाच्या नात्याची सखोलता दाखवतो.

हे पण वाचा.. अखेर ‘कमळी’ येणार अन्नपूर्णा आजींच्या दारी; गुरुजींचं भाकीत खरे ठरणार?

muramba aksay rama durava navin promo