ADVERTISEMENT

‘ठरलं तर मग’ने Star Pravah Serial TRP Chart मध्ये टॉपवर इतर मालिकांना मागे टाकलं!

Star Pravah Serial TRP Chart : स्टार प्रवाह मालिकाच्या टीआरपी यादीत पुन्हा एकदा ‘ठरलं तर मग’ मालिकेने अव्वल स्थान पटकावले आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘कोण होतीस, तू काय झालीस तू’ या मालिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. जाणून घ्या संपूर्ण टीआरपी चार्ट आणि प्रेक्षकांची आवडती मालिका कोणती ठरली!
Star Pravah Serial TRP Chart

Star Pravah Serial TRP Chart : मराठी मनोरंजन क्षेत्रात नेहमीच TRP चा खेळ रंगत असतो. कोणती मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करते आणि कोणती मागे पडते, हे ठरवणारा हा TRP चार्ट दर आठवड्याला चर्चेचा विषय ठरतो. या आठवड्यातील Star Pravah Serial च्या TRP यादीत पुन्हा एकदा ‘ठरलं तर मग’ मालिकेने बाजी मारली आहे. ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेला ४.३ अशी जबरदस्त रेटिंग मिळाली आहे आणि त्यामुळेच ती पहिल्या स्थानावर कायम आहे. या मालिकेतील पात्रांची सशक्त मांडणी, भावनिक प्रसंग आणि नात्यांमधील गुंतागुंत प्रेक्षकांना खिळवून ठेवते. या लोकप्रियतेमुळे ‘ठरलं तर मग’ ने पुन्हा एकदा आपली बादशाही कायम ठेवली आहे.

दुसऱ्या स्थानावर आहे ‘घरोघरी मातीच्या चुली’. या मालिकेला ४.२ रेटिंग मिळाले असून तिच्या कथानकात अलीकडेच अनेक नाट्यमय वळणं आली आहेत. ऐश्वर्याच्या आयुष्यातील सत्य उघड होताना प्रेक्षकांना भावनिक क्षण अनुभवायला मिळाले. रणदिवे कुटुंब आणि जानकीच्या प्रयत्नांनी मालिकेचा रंग अजून खुलला असून, प्रेक्षकांचा उत्साह कायम दिसत आहे.

तिसऱ्या क्रमांकावर ‘कोण होतीस, तू काय झालीस तू’ ही मालिका ३.६ या रेटिंगसह स्थिरावली आहे. मालिकेत सध्या घडत असलेल्या घटनांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. चौथ्या स्थानावर ‘तू ही रे माझा मितवा’ आणि पाचव्या स्थानावर ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या दोन्ही मालिकांना ३.४ अशी समान रेटिंग मिळाली आहे.

नवीन सुरू झालेल्या ‘नशीबवान’ या मालिकेलाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, ती सहाव्या स्थानावर पोहोचली आहे. या मालिकेला ३.२ रेटिंग मिळाले आहे. तर, ‘लपंडाव’ या नव्या मालिकेला १.९ रेटिंग मिळाले असून ती सध्या बाराव्या स्थानी आहे.

याशिवाय ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’, ‘ये ड लागलं प्रेमाचं’, ‘आता होऊ दे धिंगाणा’, ‘साधी माणसं’, ‘मुरांबा’, ‘अबोली’, ‘शुभविवाह’ आणि ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या मालिकाही यादीत आपापल्या स्थानावर स्थिर आहेत.

हे पण वाचा.. “‘लाखात एक आमचा दादा’ मालिका संपली; अभिनेत्री कोमल मोरे हिची भावुक निरोपपोस्ट चर्चेत!

TRP चार्ट पाहता स्पष्ट होते की Star Pravah Serial वरील कथा, अभिनय आणि दिग्दर्शनाचा दर्जा सातत्याने सुधारतो आहे. आगामी आठवड्यात या यादीत कोणती उलथापालथ होते, कोणती मालिका वर चढते आणि कोणती मागे पडते, हे पाहणे तितकेच रंजक ठरणार आहे.

हे पण वाचा.. बिग बॉस १९’वर अरमान मलिकचा खुलासा: “हा शो खूप टॉक्झिक आहे, भाऊ अमालला चुकीचं दाखवलं जातंय”