bigg boss 19 contestants education hindi : ‘बिग बॉस’चा नवा सीझन सुरू झाल्यानंतर घरातील वाद, मैत्री आणि नातेसंबंधांबरोबरच प्रेक्षकांना स्पर्धकांविषयीच्या वैयक्तिक गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असते. Bigg Boss 19 मध्ये या वेळी विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटी एकत्र आले आहेत. कुणी अभिनयातून लोकप्रिय झालंय, कुणी संगीतकार आहे, तर कुणी सोशल मीडियावर लाखोंच्या फॉलोअर्ससह ओळखला जातो. मात्र, स्पर्धकांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीकडे नजर टाकली तर काहींचं शिक्षण खूपच प्रभावी ठरतं.
प्रथम बोलायचं झालं तर अभिनेत्री कुनिका सदानंद या घरातील सर्वाधिक शिकलेल्या सदस्य आहेत. त्यांनी कायद्याचे सखोल शिक्षण घेतले असून बॅचलर ऑफ लीगल सायन्स, बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ तसेच ह्युमन राइट्स या विषयात पदवी मिळवली आहे. याशिवाय त्यांनी नालसार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, हैदराबाद येथून फॉरेन्सिक लॉचं विशेष शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे त्या घरात ‘मोस्ट क्वालिफाईड’ ठरल्या आहेत.
दुसरीकडे, मराठी प्रेक्षकांसाठी ओळखीचा चेहरा म्हणजे प्रणित मोरे. कॉमेडी स्टेजवरून घराघरात पोहोचलेल्या प्रणितनं सोमय्या कॉलेजमधून सायन्स अँड कॉमर्सचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची पदवी मिळवली. त्यामुळे तोही शैक्षणिक दृष्ट्या मागे नाही.
गौरव खन्ना, जो हिंदी टीव्हीवर मोठं नाव आहे, यानं सुरुवातीला आयटी क्षेत्रात मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केलं होतं. पण त्याआधी त्यानं एमबीएची पदवी घेतलेली. त्यामुळे करिअरमध्ये अभिनयाला वळण देण्याआधी तो शिक्षणातही यशस्वी ठरला होता.
लोकप्रिय संगीतकार अमाल मलिकनं लहानपणापासून संगीतावर लक्ष केंद्रित केलं असलं, तरी शिक्षणाकडेही तो तितकाच जागरूक होता. त्यानं मुंबईतील एनएम कॉलेजमधून कॉमर्समध्ये बॅचलर्सची पदवी घेतली आहे.
अशनूर कौर, जी ‘यह रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमुळे प्रसिद्ध झाली, तिनं शैक्षणिक क्षेत्रातही उत्तम कामगिरी केली आहे. दहावीला ९३% आणि बारावीला ९४% गुण मिळवत तिनं जय हिंद कॉलेजमधून बीएमएम पूर्ण केलं आहे.
तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तान्या मित्तल ग्वालियर येथील विद्या पब्लिक स्कूलमधून ग्रॅज्युएट झाल्यानंतर आर्किटेक्चरच्या अभ्यासासाठी चंदिगडला गेली होती. मात्र, करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिनं शिक्षण अर्ध्यातच सोडलं.
हे पण वाचा.. ‘Bigg Boss 19’ house मध्ये सापाची एंट्री, मृदुल तिवारीनं दाखवलं धाडस; प्रेक्षक थक्क!
एकंदरीत, Bigg Boss 19 मध्ये फक्त मनोरंजनासाठीच नव्हे, तर शैक्षणिक पार्श्वभूमीनेही सजलेले स्पर्धक आहेत. यामध्ये कुनिका सदानंद सर्वाधिक शिक्षण घेतलेल्या म्हणून विशेष ठरतात, तर इतरही कलाकारांनी आपल्या करिअरसह शिक्षणालाही महत्त्व दिल्याचं दिसून येतं.
हे पण वाचा.. कमळीची जिद्द की अनिकाचे कारस्थान? मालिकेत पुढील भाग ठरणार निर्णायक”









