ADVERTISEMENT

“नवरात्रीत देवीदर्शनाचा खास अनुभव, तेजस्विनी लोणारीने सांगितली मनाला भिडणारी गोष्ट”

navratri tejaswini lonari devi darshan anubhav : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने तिच्या यूट्यूब चॅनलमधून नवरात्रीत मंदिर प्रवासाची सुरुवात केली आहे. यात तिने येवल्याच्या जगदंबा देवी मंदिराला दिलेली भेट तिच्यासाठी विशेष ठरली असल्याचं ती सांगते.
navratri tejaswini lonari devi darshan anubhav

navratri tejaswini lonari devi darshan anubhav : बिग बॉस मराठीमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अभिनय क्षेत्रात आपली वेगळी छाप सोडलेली तेजस्विनी आता तिच्या यूट्यूब चॅनलमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या चॅनलमधून तिने “Temple Trails” नावाचा खास उपक्रम सुरू केला असून यातून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचा प्रवास ती प्रेक्षकांसोबत शेअर करत आहे.

नवरात्रीच्या उत्सवात या प्रवासाला एक वेगळीच रंगत आली. कारण यंदा तेजस्विनीने आपल्या मूळ गाव येवल्यातील जगदंबा माता मंदिराला भेट दिली. या अनुभवाबद्दल बोलताना ती म्हणाली, “मी येवल्याची असल्याने दरवर्षी नवरात्रीत जगदंबा देवीच्या मंदिरात जाणं माझ्यासाठी परंपरेसारखं आहे. या देवीबद्दल असं मानलं जातं की इथे केलेली प्रत्येक प्रार्थना, नवस आणि इच्छा पूर्ण होते. आमच्यासाठी हे केवळ मंदिर नाही तर एक श्रद्धास्थान आहे. त्यामुळे माझ्या ‘Temple Trails’ प्रवासात हे मंदिर प्रेक्षकांसमोर मांडणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं.”

तेजस्विनीने या प्रवासात फक्त मंदिर दर्शनच नव्हे तर नवरात्रीतले नऊ दिवस खास पद्धतीने अनुभवले. दरवर्षी उपवास करताना ती नऊ दिवसांचा वेगळा रंग आणि ऊर्जा अनुभवते. याच निमित्ताने तिने नऊ रंगांच्या साड्यांमध्ये फॅशन आणि पारंपरिकतेचा सुंदर संगम साधत एक खास फोटोशूटही केलं. पारंपरिक सणाला मॉर्डन टच देण्याचा हा तिचा वेगळा प्रयत्न प्रेक्षकांना खूप आवडला.

अभिनय क्षेत्रात नाव कमावलेल्या तेजस्विनीने आता स्वतःची निर्मितीविश्वाची ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. तिच्या या नवीन प्रवासामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली असून, पुढे ती कोणत्या वेगळ्या भूमिकांमध्ये झळकणार याची चाहत्यांना उत्सुकतेने प्रतीक्षा आहे.

हे पण वाचा.. शाळेच्या पहिल्या दिवशी हरवलेली अभिज्ञा भावे आई-वडिलांनी सांगितला किस्सा

नवरात्रीच्या सणात श्रद्धा, भक्ती आणि फॅशन यांचा सुंदर संगम तेजस्विनीने दाखवून दिला आहे. तिच्यासाठी येवल्याची जगदंबा देवी ही फक्त आस्था नसून तिच्या जीवनातील एक भावनिक नाळ आहे, असं ती स्पष्टपणे सांगते. त्यामुळे तिच्या या अनुभवाने प्रेक्षकांनाही मंदिर प्रवासाची नवी प्रेरणा मिळत आहे.

हे पण वाचा.. सायली अर्जुनने गाठोड्या सहित प्रियाला गाठलं, महिपत पोचला प्रियाच्या खऱ्या घरी Tharala Tar Mag 1 October

navratri tejaswini lonari devi darshan anubhav