tejashree pradhan television industry pratikriya : मराठी चित्रपटसृष्टीत आणि मालिकाविश्वात आपल्या अभिनयाने ठसा उमटवणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नेहमीच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी तेजश्री हिने यावेळी टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं आहे. अनेकदा मालिकांविषयी नकारात्मक चर्चा होत असते, मात्र तेजश्रीने या चर्चांवर आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया देत टेलिव्हिजनच्या महत्वावर भर दिला आहे.
एका मुलाखतीत बोलताना तेजश्री प्रधान म्हणाली की, तिला तिच्या नाट्यप्रवासात वरिष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचं एक वाक्य कायम लक्षात राहतं. ती सांगते, “नाटकाचे काही प्रयोग सुरू असताना प्रशांत दादा सहजपणे म्हणाले होते – ‘जे माध्यम आपल्याला बोलावते त्याकडे कधीही पाठ फिरवायची नाही.’ त्या दिवसापासून मी हे वाक्य मनात ठेवलं आहे.” तिच्या मते, टेलिव्हिजन हे असं माध्यम आहे ज्याने कलाकारांना खरी ओळख दिली आणि त्यांचं करिअर घडवलं.
तेजश्री प्रधानच्या मते, सिनेमा आणि नाटक यांना प्रेक्षकांची निष्ठावंत साथ मिळत असली, तरी घरोघरी पोहोचून प्रेक्षकांना आपल्या भूमिकांशी जोडून ठेवण्याचं काम मालिकांचं आहे. अनेकांना टेलिव्हिजनविषयी कमी लेखण्याची प्रवृत्ती आहे, परंतु प्रत्यक्षात या माध्यमानेच अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळवून दिली आहे. तिने ठामपणे सांगितलं की, “टेलिव्हिजननं मराठी सिनेइंडस्ट्रीला तारलं आहे. भविष्यातही हे माध्यम आपल्याला बोलावणार यात शंका नाही.”
आजवर तेजश्री प्रधानने मालिकांपासून चित्रपट आणि नाटकापर्यंत प्रत्येक माध्यमात काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिच्या ‘हॉन डोन टेच मी’, ‘लग्नाची वाईफ लग्नाचा नवरा’, ‘आणी काय हवं’, तसेच विविध मालिकांमधील भूमिका रसिकांच्या कायम लक्षात राहिल्या आहेत. मात्र, तिच्या मते सर्वाधिक पोहोच मिळवून देणारं माध्यम म्हणजे टेलिव्हिजनच.
तिने सांगितलेलं अनुभवांवर आधारित हे मत केवळ तिच्या करिअरसाठीच नाही तर संपूर्ण मराठी मनोरंजन क्षेत्रासाठी महत्वाचं आहे. टीका कितीही झाली तरी टेलिव्हिजननेच प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजन दिलं आहे आणि त्याचबरोबर कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे.
हे पण वाचा.. ईशा संजयचा ग्लॅमरस अवतार; नारकर कुटुंबाची होणारी सून सोशल मीडियावर चर्चेत!”
तेजश्री प्रधानचं हे वक्तव्य मालिकांविषयी नकारात्मक दृष्टीकोन ठेवणाऱ्यांसाठी एक ठोस उत्तर मानलं जात आहे. तिच्या या स्पष्ट मतामुळे पुन्हा एकदा टेलिव्हिजन इंडस्ट्रीचं महत्व अधोरेखित झालं आहे.
हे पण वाचा.. राष्ट्रीय टेलिव्हिजनवर गाजलं अविका गौरचं लग्न, मिलिंदसोबतच्या जोडीला चाहते म्हणाले ‘क्युट कपल’







