isha sanjay bold look relationship news : मराठी मनोरंजनविश्वात आता ग्लॅमर, स्टाईल आणि बोल्ड अंदाजाचीही जोरदार चर्चा होऊ लागली आहे. लहान पडद्यावर मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर आपली वेगळीच छाप पाडताना दिसतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे ईशा संजय.
‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत साध्या, सरळसोट राजश्रीच्या भूमिकेत झळकलेली ईशा संजय खऱ्या आयुष्यात मात्र अगदी हटके आहे. नुकत्याच तिने शेअर केलेल्या फोटोशूटने तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करून टाकले. व्हाईट-ब्लॅक प्रिंटेड हाय स्लीट वनपीस घालून ईशाने बीचवर दिलेल्या पोजने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.
समुद्रकिनारी वाऱ्यावर उडणारे तिचे मोकळे केस, पायातली पैंजण आणि गळ्यातील नाजूक दागिने या सगळ्यामुळे तिचा लूक आणखीनच खुलून दिसतो. फोटोसोबत दिलेल्या “सजना अनाडी बेईमान” या कॅप्शनमुळेही चाहते खास उत्सुक झाले आहेत. काही मिनिटांतच हजारो लाईक्स आणि शेकडो कमेंट्स येऊन तिच्या बोल्ड अदा सर्वांच्या चर्चेत आल्या आहेत.
पडद्यावर पारंपरिक किंवा साध्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींचा खऱ्या आयुष्यातील ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते अनेकदा थक्क होतात. ईशाचं हेच उदाहरण. तिच्या फोटोंवरून नजर हटवणंच कठीण झालं आहे. चाहत्यांनी तिचं कौतुक करताना “अतिशय सुंदर”, “खूपच बोल्ड”, “ग्लॅमरस क्वीन” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
याच दरम्यान ईशा तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. मराठीतील लोकप्रिय कपल अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांचा मुलगा अमेय नारकरसोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. ईशा आणि अमेयने एकत्रित अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यावरून त्यांच्या नात्याचा अंदाज लावता येतो. गेल्या काही वर्षांपासून ते एकमेकांसोबत असल्याचं म्हटलं जातं.
हे पण वाचा.. राष्ट्रीय टेलिव्हिजनवर गाजलं अविका गौरचं लग्न, मिलिंदसोबतच्या जोडीला चाहते म्हणाले ‘क्युट कपल’
विशेष म्हणजे, ईशाचं होणाऱ्या सासूसोबत म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्यासोबतचं बंधही फारच खास आहे. सोशल मीडियावर ईशाने त्यांच्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे नारकर कुटुंबासोबत तिचं नातं घट्ट असल्याचं दिसून येतं.
ईशा संजयने अभिनयातून आपली वेगळी ओळख निर्माण केली असली तरी, तिचा बोल्ड अंदाज आणि रिलेशनशिपमुळे ती सध्या अधिकच चर्चेत आहे. पडद्यावर साधेपणाने झळकणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस आणि स्टायलिश अवतारात चाहत्यांची मनं जिंकताना दिसत आहे.
हे पण वाचा.. “दुसऱ्या लग्नानंतर नवऱ्याला कर्करोग; पण अभिज्ञा भावेच्या आयुष्यातील खरी ताकद ठरली पालकांची साथ!”









