ADVERTISEMENT

राष्ट्रीय टेलिव्हिजनवर गाजलं अविका गौरचं लग्न, मिलिंदसोबतच्या जोडीला चाहते म्हणाले ‘क्युट कपल’

avika gor milind chandwani lagn bandhan : ‘बालिका वधू’ फेम अविका गौर अखेर लग्नबंधनात अडकली आहे. रिएलिटी शो ‘पती पत्नी और पंगा’च्या सेटवर तिचा मिलिंद चंदवानीसोबत खरंखुरं विवाहसोहळा पार पडला असून, सोशल मीडियावर या नव्या जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
avika gor milind chandwani lagn bandhan

avika gor milind chandwani lagn bandhan : लहानपणी ‘छोटी आनंदी’ म्हणून घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांची मनं जिंकणारी Avika Gor आता नव्या जीवनप्रवासाला सुरुवात करत आहे. लोकप्रिय अभिनेत्री अविकाचं मिलिंद चंदवानीसोबत लग्न झालं असून, त्यांचा हा सोहळा अगदी अनोख्या पद्धतीने राष्ट्रीय टेलिव्हिजनवर पार पडला.

काही महिन्यांपूर्वी या जोडीने साखरपुडा केल्याची बातमी चाहत्यांमध्ये चर्चेत आली होती. त्यानंतर दोघेही ‘पती पत्नी और पंगा’ या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाले. या कार्यक्रमादरम्यानच त्यांच्या लग्नाचा सोहळा पार पडला. सर्व पारंपरिक विधींच्या साक्षीने हा विवाह रंगला आणि छोट्या पडद्यावरील कलाकारही या सोहळ्यात सहभागी झाले.

लग्नाच्या वेळी अविका गौर लाल रंगाच्या भरजरी लेहेंग्यात खुलून दिसत होती. नथ, राणी हार, भरजरी बांगड्या आणि पारंपरिक दागिन्यांनी तिने आपला लूक पूर्ण केला होता. तर मिलिंद गुलाबी रंगाच्या शेरवानीसह फेट्यात अत्यंत देखणा दिसत होता. लग्नानंतर या जोडीने कॅमेऱ्यासमोर दिलेल्या पोजेस चाहत्यांच्या मनाला भावल्या. एका क्षणी मिलिंदने अविकाला उचलून घेतलं आणि त्या रोमँटिक क्षणाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. ढोल-ताशांच्या गजरात दोघांनी दिलखुलास डान्स करत वातावरण रंगवलं.

सोशल मीडियावर अविका गौर आणि मिलिंदच्या लग्नाचे फोटो, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. चाहत्यांनी त्यांच्या नव्या आयुष्याला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ‘छोटी आनंदी आता खऱ्या आयुष्यात नवरी झाली’ अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून येत आहेत.

कोण आहेत मिलिंद चंदवानी?

अविकाचा जीवनसाथी मिलिंद चंदवानी हा मूळचा टेक्नोक्रॅट असून त्याने आयआयएम अहमदाबादमधून एमबीए पूर्ण केलं आहे. इन्फोसिसमध्ये काम केल्यानंतर त्याने सामाजिक कार्यात पाऊल टाकलं. २०१८ मध्ये त्याने ‘कॅम्पस डायरीज’ या एनजीओची स्थापना केली आणि तरुणांसोबत अनेक उपक्रम राबवले. मिलिंदने एमटीव्ही रोडीजमध्येही सहभाग घेतला होता. पुढे तो ‘कुकू एफएम’मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत होता.

हे पण वाचा.. “दुसऱ्या लग्नानंतर नवऱ्याला कर्करोग; पण अभिज्ञा भावेच्या आयुष्यातील खरी ताकद ठरली पालकांची साथ!”

मिलिंद आणि अविकाची पहिली भेट त्याच्या एनजीओच्या एका कार्यक्रमात झाली. ही ओळख पुढे मैत्रीत रूपांतरित झाली आणि नंतर ती प्रेमात बदलली. सध्या २८ वर्षांची असलेली अविका गौर आणि ३४ वर्षीय मिलिंद चंदवानी या दोघांच्या प्रेमकथेचा शेवट आता विवाहबंधनात झाला आहे.

चाहत्यांसाठी ही जोडी म्हणजे ‘परफेक्ट कपल’ ठरली असून, त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असताना, प्रेक्षक नव्या प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा देत आहेत.

हे पण वाचा.. सावळ्याची जणू सावली’ फेम प्राप्ती रेडकरचा नवरात्री लूक चर्चेत; चाहत्यांच्या कमेंट्सनी रंगली मजा

avika gor milind chandwani lagn bandhan