savalyachi janu savali prapti redkar navratri look : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सावळ्याची जणू सावली’ प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. या मालिकेतील सावलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राप्ती रेडकर सतत चर्चेत असते. मालिकेतील भूमिकेत ती साधी, प्रेमळ पण अडचणींना खंबीरपणे सामोरी जाणारी स्त्री म्हणून दाखवली जाते. मात्र, यावेळी ती मालिकेतील कथानकामुळे नव्हे तर तिच्या खास लूकमुळे चर्चेचा विषय ठरली आहे.
नवरात्रीच्या नवव्या दिवशी झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला. यात प्राप्ती रेडकरचा पारंपरिक अवतार पाहायला मिळाला. तिने आकर्षक गुलाबी रंगाची साडी नेसली होती, त्यासोबत सोन्याचे दागिने, बाजूबंद, कपाळावर चंद्रकोर असा देखणा साज होता. विशेष म्हणजे शेवटी तिने तिचा सिग्नेचर चष्मा देखील घालून फोटोशूट केले, ज्यामुळे हा लूक आणखी उठून दिसला.
या व्हिडीओला मिळालेल्या प्रतिसादात सहकलाकारांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनीच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. ‘पारू’ फेम शरयू सोनावणेने “सुंदरी” अशी थेट प्रतिक्रिया दिली, तर मेघा धाडेने “अति सुंदर, नितांत सुंदर, माझी साऊ” असे लिहून कौतुक केले. भाग्यश्री दळवीनेही “सुंदर” अशी साधी पण मनापासून प्रतिक्रिया दिली.
सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया मात्र अधिक रंगतदार ठरल्या. एका नेटकऱ्याने लिहिले, “सावली + सुंदर = सादर. आजची कोल्हापूरची देवी हिचे रूप अगदी हुबेहूब दिसते. फक्त देवीने चष्मा घातला नाही एवढाच फरक.” या कमेंटसोबत हास्याची इमोजीही देण्यात आली होती. इतरांनी “मनमोहिनी”, “क्यूट”, “चष्मा पाहिजेच का?” अशा विविध कमेंट्स करून तिच्या लूकवर चर्चा रंगवली.
हे पण वाचा.. “सुमंत ठाकरेची अनिता दातेसाठी भावूक पोस्ट; म्हणाला – माझ्या आयुष्यातील खरी नवदुर्गा”
सध्या मालिकेत नवीन वळण येत असून शिवानीच्या पात्रामुळे सावलीच्या आयुष्यात अडचणी वाढल्या आहेत. ऐश्वर्या आणि तिच्या कारस्थानांना सावली कशी सामोरी जाणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पण या सर्व नाट्यमय घडामोडींमध्येही प्राप्ती रेडकरचा नवरात्रीतील पारंपरिक लूक हा प्रेक्षकांसाठी एक आनंददायी सरप्राईज ठरला आहे.
हे पण वाचा.. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत नवा कलाटणीचा प्रोमो; समर-स्वानंदीमध्ये पुन्हा गैरसमज निर्माण होणार?









