santosh juvekar marathi abhinetri vaktavya : मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप पाडणारा अभिनेता Santosh Juvekar पुन्हा एकदा त्याच्या थेटपणामुळे चर्चेत आला आहे. ‘झेंडा’, ‘मोरया’ आणि ‘लालबाग परळ’ सारख्या हिट सिनेमांमधून तो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. तसेच, हिंदी चित्रपट छावा मुळे त्याला ओळख मिळाली. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत संतोषने मराठी कलाकार, अभिनेत्री आणि इंडस्ट्रीबद्दल काही धाडसी मते मांडली आहेत.
यूट्यूबवरील ‘इसापनीती’ या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, अनेकदा आपलेच कलाकार एकमेकांना योग्य तो सन्मान देत नाहीत. संतोषच्या म्हणण्यानुसार, “एका लोकप्रिय अभिनेत्रीने साऊथच्या मोठ्या अभिनेत्याचं कौतुक करताना सांगितलं होतं की तो किती साधेपणाने वागतो, जमिनीवर बसून जेवतो. पण त्याच अभिनेत्रीने आपल्या मराठी कलाकारांबद्दल मात्र उलट बोललं – काम मिळताच माज दाखवतात. मी तिला विचारलं, मी कधी तुझ्याशी वाईट वागलो का? मोठ्या स्टारचं कौतुक कर, पण आपल्या घरच्या कलाकारांचा मान राखणं तितकंच महत्त्वाचं आहे.”
यावेळी संतोषने मराठी अभिनेत्रींबद्दलही थेट भाष्य केलं. तो पुढे म्हणाला, “मुलाखतीत जेव्हा आपल्या अभिनेत्रींना विचारतात की डेटवर कोणासोबत जायला आवडेल, तेव्हा उत्तर असतं रणबीर कपूर किंवा विकी कौशल. खरंच ते तुमच्याकडे बघतील का? आपल्या मराठीत अंकुश चौधरी, सुबोध भावे, प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, उमेश कामत असे अनेक हँडसम आणि टॅलेंटेड स्टार्स आहेत. तुम्ही त्यांच्यासोबत काम करता, ते पण स्टार आहेत. मग परदेशी किंवा हिंदी अभिनेत्यांवरचं वेड कशासाठी?”
त्याने स्पष्ट केलं की अशा वृत्तीमुळे मराठी चित्रपटसृष्टीला नेहमी दुय्यम स्थान मिळतं. “आपणच आपल्याला मान दिला नाही, तर इतरांकडून तो कसा अपेक्षित करणार? मग आपण म्हणतो मराठी सिनेमा चालत नाही, पण खरा प्रश्न आपल्याच आदरभावनेत आहे,” असं संतोषने ठामपणे सांगितलं.
हे पण वाचा.. “सोशल मीडियाची भीती वाटायला लागलीय” – प्राजक्ता माळीचा धक्कादायक अनुभव, चाहत्यांना दिला खास सल्ला
संतोष जुवेकरची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकांनी त्याच्या मताला समर्थन दिलं आहे. काहींनी मात्र यावर वेगळे दृष्टिकोन मांडले आहेत. पण इतकं मात्र नक्की की, Santosh Juvekar ने पुन्हा एकदा आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हे पण वाचा.. “‘प्रेम नकळत होत नाही!’ गश्मीर महाजनिचं मनमोकळं उत्तर चर्चेत”









