ADVERTISEMENT

महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहतांचे निधन; मुलगा सत्याची भावुक पोस्ट

mahesh manjrekar first wife deepa mehta passed away marathi news : दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहतांचे निधन झाले आहे. मुलगा सत्याने भावुक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.
mahesh manjrekar first wife deepa mehta passed away marathi news

mahesh manjrekar first wife deepa mehta passed away marathi news : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांच्या वैयक्तिक आयुष्यात दुःखद घटना घडली आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचे म्हणजेच Mahesh Majrekar First Wife Deepa Mehta passed away. ही माहिती त्यांच्या मुलगा सत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. सत्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या आईचा एक जुना फोटो शेअर करत “I miss you mumma” असे भावनिक शब्द लिहिले. काही तासांतच ही पोस्ट व्हायरल झाली आणि चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होऊ लागली.

दीपा मेहता या व्यवसायाने फॅशन डिझायनर होत्या. त्यांचा स्वतःचा ‘Queen of Hearts’ नावाचा साड्यांचा ब्रँड होता. त्यांच्या डिझाइन्सना केवळ मराठी सिनेविश्वातूनच नव्हे तर बॉलिवूड कलाकारांकडूनही चांगली मागणी होती. त्यांच्या या ब्रँडसाठी त्यांची मुलगी अश्वमी मांजरेकर मॉडेलिंग करत असे. अश्वमीदेखील अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावत आहे.

महेश आणि दीपा यांना दोन अपत्ये आहेत – सत्या मांजरेकर आणि अश्वमी मांजरेकर. सत्या मांजरेकरने “माज्या” या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकले. अश्वमीने फॅशन आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रांत आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

महेश मांजरेकर आणि दीपा मेहता यांचा पुढे घटस्फोट झाला होता. या निर्णयानंतर मुलं आपल्या आईबरोबर राहत होती. मात्र पती-पत्नी म्हणून वेगळे झाले तरी दोघांचा एकमेकांशी आदर कायम होता.

त्यानंतर महेश मांजरेकर यांनी दुसरं लग्न अभिनेत्री मेधा मांजरेकर यांच्याशी केलं. मेधा व महेश यांना सई मांजरेकर ही मुलगी आहे, जी ‘दबंग ३’मधून सलमान खानसोबत झळकली.

हे पण वाचा.. “बाबाच्या छातीत दुखत होतं अन्…” मिलिंद गवळींच्या भावनिक प्रसंगाचा खुलासा, लेक मिथिलाने सांगितला

दीपा मेहतांच्या निधनामुळे संपूर्ण मांजरेकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी आणि परिचितांनी सोशल मीडियावरून त्यांच्या आत्म्यास श्रद्धांजली वाहिली. सत्याच्या पोस्टनंतर अनेक कलाकारांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या.

महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनाने चाहत्यांना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. दीपा मेहता या केवळ एक डिझायनर नव्हत्या, तर एक समर्पित आई आणि आत्मनिर्भर स्त्री होत्या. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेविश्वाने एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

हे पण वाचा..“लंडनच्या फ्लाइटसाठी बॅग भरली, पण शेवटच्या क्षणी संधी हातातून गेली!” – गायत्री दातारचा अनुभव

mahesh manjrekar first wife deepa mehta passed away marathi news