lagnaabaddal abhijit amkar pratikriya : टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘तू ही रे माझा मितवा’ मधील अर्णव म्हणजेच अभिनेता Abhijit Amkar सध्या छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चेहऱ्यांपैकी एक आहे. मालिकेत नुकतंच अर्णव आणि इश्वरीचं लग्न झालं असून या प्रसंगामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. याच दरम्यान खऱ्या आयुष्यात तो लग्नाबाबत काय विचार करतो, यावर त्याने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
अभिजीत आमकर सध्या अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असून दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला होता – हे दोघं खरंच कधी लग्न करणार? याबाबत अलीकडेच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत Abhijit Amkar ने आपली भूमिका स्पष्ट केली.
तो म्हणाला, “मी लग्नाबद्दल विचार केलाय, नक्कीच हा विषय मनात आलाय. पण असं नाही की मालिका संपल्यानंतर लगेचच करेन. खरं तर मला ही मालिका कधीच संपू नये असं वाटतं. ही यात्रा कायम सुरू राहावी असंच माझं मत आहे.”
यावेळी त्याला लग्न केल्यावर अनेक मुलींचा हार्टब्रेक होईल अशी टिप्पणी केली असता, शर्वरी वाघनेही गंमतीदार प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “खूप मुलींचा! कारण मला सतत मेसेज येतात. माझ्या मैत्रिणींपासून ते फॅन्सपर्यंत सगळेच अभिजीतशी बोलण्याची विनंती करतात. कधी व्हिडीओ कॉल लावून दे, कधी रिप्लाय करायला सांग वगैरे.”
अभिजीतप्रमाणेच नक्षत्रा मेढेकरही मालिकांच्या विश्वात सक्रिय आहे. ‘लेक माझी लाडकी’, ‘माझिया माहेरा’, ‘चंद्र आहे साक्षीला’ यांसारख्या मालिकांमध्ये तिने दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे ही जोडी चाहत्यांच्या मनात कायम चर्चेत असते.
हे पण वाचा.. ३ वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन, ‘अबोली’ मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार अदिती द्रविड
दरम्यान, मालिकेत अर्णव–इश्वरीचं लग्न झाले असलं तरी पुढे त्यांचं नातं कसं फुलतं, इश्वरी अर्णवच्या प्रेमात खरंच पडते का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मात्र खऱ्या आयुष्यात Abhijit Amkar ने लग्नाबद्दल दिलेली ही स्पष्टवक्ती प्रतिक्रिया चाहत्यांना निश्चितच भावली आहे.
हे पण वाचा.. “माजिवडा उड्डाणपुलावरचा अनुभव; ‘माणुसकी अजून जिवंत आहे’ म्हणत मीरा जोशी ची हृदयस्पर्शी पोस्ट”









