jui gadkari netkar trolling pratikriya : मराठी टेलिव्हिजनच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक जुई गडकरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. चाहत्यांशी संवाद साधणे, आपले फोटो व अपडेट्स शेअर करणे तिला आवडतं. मात्र, अलीकडेच एका नेटकऱ्याने केलेल्या वैयक्तिक कमेंटवरून जुई गडकरीने संताप व्यक्त केला आणि त्याचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर शेअर करत त्याला चांगलंच सुनावलं.
नवरात्रीनिमित्त जुईने केलेल्या फोटोशूटचे काही सुंदर फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर टाकले होते. हे फोटो पाहून एका युजरने तिला पर्सनल मेसेज करत, “लग्न कर जुई, कोणासोबतही पण कर. TRP कमी होतोय, मार्केटिंग कमी पडलंय. मालिकेत तुम्ही मोठ्या असाल पण लग्न नाही, कुटुंब नाही… विचार करा” अशी टीका केली.
हा मेसेज पाहून शांत स्वभावासाठी ओळखली जाणारी जुई गडकरीदेखील चिडली. तिने लगेचच या मेसेजचा स्क्रीनशॉट आपल्या स्टोरीवर टाकत त्या नेटकऱ्याला प्रत्युत्तर दिलं. अभिनेत्री म्हणाली, “अशा माणसांची खरंच कीव येते. देव तुम्हाला सुबुद्धी देवो आणि लवकर बरे व्हा. तुमचा त्रास लवकर कमी होवो हीच प्रार्थना.”
जुईने या पोस्टसोबत #SickPeople आणि #SickMinds हे हॅशटॅग्जही वापरले, ज्यातून तिने अशा मानसिकतेच्या लोकांवर आपला रोष स्पष्ट केला. तिच्या या प्रतिक्रियेला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दर्शवला असून अनेकांनी सोशल मीडियावर तिच्या धाडसी भूमिकेचं कौतुक केलं.
हे पण वाचा.. म्हणून मी नकारात्मक भूमिका करतोय; ‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwadची स्पष्ट प्रतिक्रिया
‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली जुई गडकरी आपल्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. यापूर्वी अनेकदा कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला असला, तरी जुईने ज्या पद्धतीने संयमी पण ठाम शब्दांत उत्तर दिलं, त्याचं उदाहरण क्वचितच पाहायला मिळतं.
सोशल मीडियावर मिळणाऱ्या लोकप्रियतेसोबतच टीका आणि ट्रोलिंगही वाढतं, मात्र त्याला कशा प्रकारे सामोरं जायचं याचं उत्तम उदाहरण जुईने आपल्या चाहत्यांसमोर ठेवलं आहे. तिचा हा धाडसी अंदाज पाहून अनेकांनी कमेंट्स करत लिहिलं – “जुई, तूच खरी आयडॉल आहेस!”
हे पण वाचा.. नवऱ्याच्या निधनानंतर खचलेल्या सुरेखा कुडची; अडीच वर्षांच्या मुलीसाठी पुन्हा उभी राहिली अभिनेत्री
jui gadkari netkar trolling pratikriya

⁴









