ADVERTISEMENT

नवऱ्याच्या निधनानंतर खचलेल्या सुरेखा कुडची; अडीच वर्षांच्या मुलीसाठी पुन्हा उभी राहिली अभिनेत्री

surekha kudachi pati nidhan sangitle anubhav : टीव्ही आणि सिनेमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरेखा कुडची (Surekha Kudachi) यांनी आयुष्यातील एक हृदयद्रावक प्रसंग उघड केला आहे. पतीच्या निधनाने खचून गेलेल्या सुरेखा यांच्याकडे त्यावेळी फक्त अडीच वर्षांची मुलगी होती. मात्र कुटुंबाच्या आधाराने आणि स्वतःच्या धैर्यावर त्या पुन्हा उभ्या राहिल्या.
surekha kudachi pati nidhan sangitle anubhav

surekha kudachi pati nidhan sangitle anubhav : मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी नुकत्याच नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगाची आठवण सांगितली. ‘सन मराठी’वरील जुळली गाठ गं या मालिकेत दामिनी मुजुमदारची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीने स्पष्ट केलं की तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का म्हणजे पतीचं निधन होतं.

सुरेखा कुडची म्हणाल्या, “नवरात्री म्हणजे स्त्रीशक्तीचं प्रतीक. प्रत्येक स्त्रीमध्ये एक नवदुर्गा दडलेली असते. माझ्या आयुष्यातही असा प्रसंग आला ज्याने मला नव्याने जगायला शिकवलं. माझ्या पतीचं निधन झालं तेव्हा माझ्या पदरात अडीच वर्षांची मुलगी होती. त्या क्षणी मी अक्षरशः कोसळले होते. सोबतीचा आधार गमावणं हे खूप अवघड असतं. जवळपास सहा महिने मला सावरायला लागले.”

या काळात कुटुंबाने मोठा आधार दिल्याचंही सुरेखा यांनी सांगितलं. त्यांच्या बहिणीने दिलेल्या शब्दांनी त्यांना नव्याने धैर्य दिलं. “माझ्या बहिणीने सांगितलं की, पुन्हा कामाला सुरुवात कर. आता तुला तुझ्या मुलीसाठी खंबीर राहावं लागेल.” या प्रेरणेनेच सुरेखा यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली.

हे पण वाचा.. आई गोंधळाला ये! नवरात्रीत गौतमी पाटीलचा नवा अंदाज, भक्तीगीताने चाहत्यांची मने जिंकली

सुरेखा कुडची पुढे म्हणाल्या, “त्या काळात मी स्वामींना फक्त एकच प्रार्थना केली होती – माझ्या मुलीला कधीच काही कमी पडू नये. तिला पैशाअभावी काही मिळालं नाही असं वाटायला नको. आज तिचं शिक्षण सुरू आहे आणि तिच्या आयुष्यात काहीही कमी पडू नये, हीच माझी इच्छा आहे.”

नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या अनुभवातून सर्व महिलांना प्रेरणा देत त्यांनी सांगितलं की प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या पायावर उभं राहावं. “किमान स्वतःचा खर्च भागवू शकाल इतकं तरी काम नक्की करा. आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या,” असं आवाहन करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सुरेखा कुडचींची ही मनापासूनची कबुली अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत असून सोशल मीडियावर तिची चर्चा रंगते आहे.

हे पण वाचा.. नवरात्रीत नऊ रंगांचा वेगळा अर्थ सांगणारा कुशल बद्रिकेचा व्हिडीओ चर्चेत

surekha kudachi pati nidhan sangitle anubhav