navratri gautami patil aai gondhalala ye bhaktigeet tuLzabhavani charani sakad : महाराष्ट्राच्या तरुणाईत लोकप्रिय ठरलेली नृत्यांगना Gautami Patil पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या दमदार नृत्याने आणि मोहक अदांनी प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालणारी गौतमी आता भक्तीमय अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे. नवरात्रीनिमित्त प्रदर्शित झालेलं तिचं नवं गाणं ‘आई गोंधळाला ये’ सोशल मीडियावर सध्या जोरदार गाजत आहे.
या गाण्यात गौतमीने आई तुळजाभवानी चरणी साकडं घातलं आहे. हिरव्या रंगाच्या पारंपरिक साडीत, सोनसळी दागिन्यांत आणि कपाळावरील मळवटासह तिचा पारंपरिक लूक प्रेक्षकांच्या मनाला भावतो. देवीच्या गोंधळ परंपरेचं दर्शन घडवणारं हे गाणं तिच्या डान्ससोबत भक्तिभावही व्यक्त करतं. प्रेक्षक तिच्या या अनोख्या रूपाचं कौतुक करत असून, कमेंट्समध्ये तिला शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
‘आई गोंधळाला ये’ हे गाणं ‘सारेगामा मराठी’ या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचं दिग्दर्शन रोहित जाधव यांनी केलं असून संगीतकार चंदन कांबळे यांनी संगीत दिलं आहे. प्रदर्शित होताच हे गाणं व्हायरल झालं असून, काही तासांतच लाखो लोकांनी पाहिलं आहे.
हे पण वाचा.. अमृता खानविलकर हिचा फिटनेस मंत्र; PCOD वर मात करत उपवासामुळे मिळालं निरोगी आयुष्य”
गौतमी पाटीलची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. तिचं नाव घेताच स्टेज शो, डान्स परफॉर्मन्स आणि आता गाणीही तुफान हिट ठरत आहेत. काही दिवसांपूर्वीच ती सिद्धार्थ जाधवच्या ‘आतली बातमी फुटली’ या मराठी चित्रपटातील ‘सखूबाई’ गाण्यात झळकली होती. त्याआधी ती स्टार प्रवाहच्या ‘शिट्टी वाजली रे’ या शोमध्ये आणि ‘स्टार परिवार अवॉर्ड्स’मध्येही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
आता नवरात्रीनिमित्त आलेल्या या भक्तिगीतामुळे गौतमीच्या चाहत्यांना वेगळाच आनंद मिळाला आहे. स्टेजवर नेहमी ऊर्जेने भरलेली ही कलाकार आता भक्तिरसात रंगलेली पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत. तिच्या आगामी चित्रपटांबाबत आणि नवीन गाण्यांबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
हे पण वाचा.. नवरात्रीत नऊ रंगांचा वेगळा अर्थ सांगणारा कुशल बद्रिकेचा व्हिडीओ चर्चेत









