ADVERTISEMENT

पारंपरिक सौंदर्यात आरजे महावाश, नवरात्रीच्या गरबा नाईटसाठी परफेक्ट लूक चर्चेत!

rj mahvash navratri special look garba night traditional fashion trending photos : आरजे महावाश हिचा नवरात्री स्पेशल लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. पारंपरिक घागरा-चोळी, ज्वेलरी आणि हटके पाठमोऱ्या पोझमुळे तिचे फोटो गरबा नाईटसाठी परफेक्ट ठरत आहेत.
rj mahvash navratri special look garba night traditional fashion trending photos

rj mahvash navratri special look garba night traditional fashion trending photos : नवरात्रोत्सव म्हटलं की रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख, गरबा-डांडियाची धमाल आणि सजूनधजून बाहेर पडलेले तरुणाईचे ग्रुप डोळ्यासमोर येतात. याच उत्सवी वातावरणात प्रसिद्ध Rj Mahvash हिने तिचा नवरात्री स्पेशल लूक सादर करून सोशल मीडियावर चांगलीच धूम उडवली आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये Rj Mahvash पारंपरिक घागरा-चोळीमध्ये दिसली. लाल आणि काळ्या रंगाच्या या पेहरावामुळे तिचा लूक अधिकच खुलून आला आहे. साधी पण आकर्षक मेकअप स्टाईल — ब्राऊन बेस, न्यूड लिपस्टिक, आयशॅडो आणि काजळ — यामुळे तिचं सौंदर्य अधिकच उठून दिसतंय. त्यासोबतच कानातले झुमके, हातातील बांगड्या आणि गळ्यातले दागिने यांनी तिच्या लूकला पूर्णता दिली आहे.

विशेष म्हणजे, या फोटोशूटमधील तिचा पाठमोरा फोटो विशेष लक्ष वेधून घेतोय. या पोझमुळे तिच्या पारंपरिक पेहरावाला राजेशाही टच मिळाल्याचं नेटकरी म्हणत आहेत. “संस्कार आणि बंदूक दोन्ही ठेवते” असं मजेशीर कॅप्शन देत Rj Mahvash ने हे फोटो शेअर केले, आणि लगेचच तिचे हे फोटो चर्चेचा विषय ठरले.

सध्या नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “गॉर्जियस”, “गरबा क्वीन”, “परफेक्ट ट्रॅडिशनल वाइब्स” अशा प्रतिक्रिया मिळत आहेत. तिचा हा लूक गरबा नाईटसाठी एकदम योग्य ठरतोय, असं अनेकांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा.. नॅशनल टीव्हीवर अविका गौरचं लग्न; अनुपम खेर, महेश भट्ट यांसारख्या दिग्गजांकडून शुभेच्छा

वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचं झालं तर, युजवेंद्र चहल आणि Rj Mahvash यांच्या रिलेशनशिपबाबतही चर्चेत आहे. धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटानंतर चहल आणि महवशचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. यामुळे चाहत्यांमध्येही वेगवेगळ्या चर्चा रंगल्या.

फक्त रेडिओ जॉकी म्हणून नव्हे तर अभिनेत्री, कंटेंट क्रिएटर, लेखिका आणि होस्ट म्हणूनही Rj Mahvash हिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिच्या वयाच्या फक्त २८ व्या वर्षीच ती इतकी बहुमुखी प्रतिभा दाखवत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने तिने दाखवलेला हा लूक तिच्या चाहत्यांसाठी एक स्टाईल आयकॉन ठरत आहे.

हे पण वाचा.. नॅशनल टीव्हीवर अविका गौरचं लग्न; अनुपम खेर, महेश भट्ट यांसारख्या दिग्गजांकडून शुभेच्छा

rj mahvash navratri special look garba night traditional fashion trending photos