suraj chavan bigg boss marathi 5 winner lagnabandhant adknar ankita valawalkar post : ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता आणि प्रेक्षकांचा लाडका ‘गुलीगत किंग’ Suraj Chavan लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची बातमी आता निश्चित झाली आहे. काही दिवसांपूर्वी सूरजने सोशल मीडियावर एका खास फोटोमुळे सर्वांची उत्सुकता चाळवली होती. दक्षिण भारतीय लूकमध्ये त्याने एका मुलीसोबतचा फोटो शेअर केल्यावर चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली. अनेकांनी हा नवीन प्रोजेक्ट असावा असा अंदाज लावला, तर काहींनी थेट लग्न ठरल्याच्या शुभेच्छा दिल्या.
या चर्चांवर शिक्कामोर्तब केलं ते सूरजची मानलेली बहीण आणि ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर हिने. नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये अंकिताने सूरजच्या होणाऱ्या पत्नीची भेट घेतल्याचं सांगत हा आनंददायी क्षण चाहत्यांपर्यंत पोहोचवला.
अंकिताने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिलं – “सूरजला मनापासून शुभेच्छा… लग्नाला उपस्थित राहणं शक्य होईल असं वाटत नाही, पण ही एक सदिच्छा भेट!” या पोस्टमध्ये तिने सूरजच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा लपवला असून, “ही ओळख लवकरच सूरज स्वतः करून देईल,” असंही तिनं नमूद केलं.
शोमध्ये भावा-बहिणीचं नातं जपलेली सूरज–अंकिताची जोडी आजही प्रेक्षकांना आवडते. बिग बॉसपासून निर्माण झालेला हा बॉन्डिंग इतका मजबूत झाला की, अंकिताच सूरजच्या लग्नाची पहिली खुशखबर घेऊन आली.
हे पण वाचा.. “‘देवमाणूस’ फेम अस्मिता देशमुखची फसवणूक; अभिनेत्रीची चाहत्यांना सतर्क रहाण्याची कळकळीची विनंती
सध्या सूरज चव्हाणच्या लग्नाची तारीख आणि होणाऱ्या वधूची ओळख काय, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, सूरजच्या गावी बांधल्या जाणाऱ्या ‘ड्रीम होम’मध्येच पत्नीचे स्वागत होणार असल्याची चर्चा आहे.
या आनंदवार्तेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. सूरजने ‘बिग बॉस मराठी ५’ जिंकून लोकप्रियता मिळवली आणि त्यानंतर ‘झापुक झुपूक’ या चित्रपटात झळकला. आता त्याच्या आयुष्यातील नव्या पर्वाची चाहत्यांना उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
हे पण वाचा.. “‘तुला जपणार आहे’ फेम शर्वरी लोहकरे म्हणाली – ती वेळ खूप काही शिकवून गेली; संघर्षकाळावर पहिल्यांदाच भाष्य”









