dashavatar madhav siddharth menon real life wife purnima nair marathi : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला सिनेमा म्हणजे ‘दशावतार’. या सिनेमात दिलीप प्रभावळकर आणि अभिनेता Siddharth Menon यांनी बाप-लेकाची हृदयस्पर्शी जोडी साकारली. कथेत माधवची वंदूवरची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या मनाला भावली, पण खऱ्या आयुष्यातही सिद्धार्थच्या आयुष्यात एक ‘वंदू’ आहे आणि तिचं नाव आहे पूर्णिमा नायर.
सिद्धार्थ मेनन आणि पूर्णिमा यांचं काही वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज झालं. पूर्णिमा ही एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून, ती विविध विषयांवर कंटेंट तयार करते. तिचे इंस्टाग्रामवरील रिल्स आणि पोस्ट्स सतत व्हायरल होत असतात. तिच्या लूकमुळे आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वामुळे ती नेटकऱ्यांमध्येही लोकप्रिय आहे.
सिद्धार्थ मेनन आणि पूर्णिमा नायर हे पती-पत्नी एकमेकांच्या करिअरला खूपच सपोर्ट करतात. सिद्धार्थच्या ‘दशावतार’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये पूर्णिमाने मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. इतकंच नव्हे तर, जेव्हा पूर्णिमाने हा सिनेमा पाहिला तेव्हा कथेतल्या भावनिक प्रसंगांमुळे ती अश्रूंना आवरू शकली नाही. चित्रपट संपल्यानंतर तिने सिद्धार्थला मिठी मारत आपल्या भावना व्यक्त केल्या. या क्षणामुळे त्यांच्या नात्यातील घट्ट बंध दिसून आला.
दोघांचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. त्यांच्या फोटोंवर चाहत्यांकडून सातत्याने शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव होत असतो. सिद्धार्थ आणि पूर्णिमाचं रिलेशनशिप समीकरण हे नव्या पिढीतील दांपत्यांसाठी प्रेरणादायी ठरतंय.
हे पण वाचा.. ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’मधील विडंबनावर क्रांती रेडकरची प्रतिक्रिया; म्हणाली – “ही गंमत नव्हे तर गंभीर बाब आहे”
अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर Siddharth Menon हा एक बहुमुखी कलाकार मानला जातो. त्याने चित्रपट, नाटकं आणि वेबसीरीजमध्ये दमदार कामगिरी केली आहे. ‘दशावतार’मधील माधवच्या भूमिकेमुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढली असून, प्रेक्षकांनी त्याच्या नैसर्गिक अभिनयाची दाद दिली आहे.
खऱ्या आयुष्यातल्या पूर्णिमा नायरमुळे सिद्धार्थच्या आयुष्यातील वंदूची कहाणीही चाहत्यांना आता समजली आहे. दोघांचं नातं, त्यांचं परस्परांवरील प्रेम आणि एकमेकांच्या कामावरील पाठिंबा यामुळे ते सोशल मीडियावरील ‘आदर्श कपल’ म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहेत.
हे पण वाचा..आकाशात दिसले महादेव! क्रांती रेडकरच्या मुलींचा निरागस अनुभव, व्हिडीओवर चाहत्यांचा कौतुकाचा वर्षाव”









