kranti redkar mulinna aakashat disle mahadev shankar video viral : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री kranti redkar नेहमीच तिच्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असलेली क्रांती अनेकदा कुटुंबीयांसोबतचे क्षण चाहत्यांशी शेअर करताना दिसते. अलीकडेच तिने शेअर केलेला एक व्हिडीओ मात्र खास ठरला असून त्यावर चाहत्यांचा कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या व्हिडीओत क्रांतीच्या जुळ्या मुलींनी आकाशात महादेवाची आकृती पाहिल्याचा अनुभव सांगितला आहे. क्रांती व्हिडीओत सांगते, “त्या मला म्हणाल्या, मम्मी आकाशात शंकर भगवान दिसतायत, नमो नमो म्हणा.” हा प्रसंग ऐकून तिचे चाहतेही भावूक झाले आहेत. मुलींच्या निरागसतेचा आणि श्रद्धेचा हा क्षण सोशल मीडियावर लोकांच्या मनाला भिडला आहे.
व्हिडीओमध्ये क्रांती रेडकरच्या दोन्ही मुली, झिया आणि झायदा (ज्यांना ती लाडाने छबील आणि गोडो म्हणते) आकाशाकडे पाहून आनंदाने हसताना दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून हा क्षण अधिकच खास वाटतो. हा व्हिडीओ शेअर करताना क्रांतीने ‘नमो नमो’ असे कॅप्शन दिले होते.
चाहत्यांनी या व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव केला असून, “लहानग्यांचा निरागस विश्वास खूप सुंदर आहे”, “देव नेहमी भक्तांच्या नजरेत असतो”, अशा कमेंट्सने सोशल मीडिया भरून गेला आहे.
हे पण वाचा.. वीस वर्षांनंतरही आठवणी ताज्या – सुचित्रा बांदेकरसोबत काम करताना मिलिंद गवळी चा अनुभव
क्रांती रेडकरने २०१७ मध्ये समीर वानखेडे यांच्याशी विवाह केला होता. त्यानंतर २०१८ मध्ये ती जुळ्या मुलींची आई झाली. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाही तिने अभिनय आणि सोशल मीडियाशी नातं कायम ठेवलं आहे. ‘कोंबडी पळाली’ या गाजलेल्या गाण्यामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर तिने अभिनयाबरोबर दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवले.
आज मात्र तिचा हा खास कौटुंबिक व्हिडीओ चर्चेत आहे. मुलींनी पाहिलेल्या महादेवाच्या आकृतीचा किस्सा आणि त्यांची निष्पाप प्रतिक्रिया यामुळे चाहत्यांनीही क्रांतीच्या पोस्टला दाद दिली आहे.
हे पण वाचा.. स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’मध्ये रुची जाईल साकारणार चेटकीणची भूमिका, अक्षय केळकरसोबत झळकणार मुख्य भूमिकेत









