siddharth menon dashavatar marathi chitrapat kerala mulga pune abhinetya pravas : मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारणारा अभिनेता Siddharth Menon सध्या चर्चेत आहे. ‘दशावतार’ या चित्रपटामुळे तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या प्रभावी ‘बाबुली’सोबत त्याचा मुलगा माधव ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
सिद्धार्थ मेनन हा प्रेक्षकांना ‘जून’, ‘पोश्टर गर्ल’, ‘राजवाडे अँड सन्स’, ‘पोपट’ आणि ‘एकुलती एक’ या चित्रपटांमधून परिचित आहे. त्याच्या अभिनयशैलीत सहजता, तर भूमिकांमध्ये नैसर्गिकता दिसून येते. पण त्याच्याबद्दल एक खास गोष्ट म्हणजे तो मुळचा मराठी नसून केरळचा आहे. तरीदेखील त्याने आतापर्यंत एकही साऊथ सिनेमात काम केलेलं नाही.
याबद्दल स्वतः Siddharth Menon ने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं, “मी केरळचा असूनही माझं मन पूर्णपणे मराठी आहे. मी पुण्यात मोठा झालो, मराठी सिनेमे पाहत वाढलो. त्यामुळे माझी ओळख ही मराठीच आहे. महाराष्ट्राने मला स्वीकारलं आणि आज मी ज्या ठिकाणी आहे, ते मराठी प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच.”
मराठी चित्रपटांसोबतच सिद्धार्थनं काही हिंदी प्रोजेक्ट्समध्येही काम केलं आहे. इम्तियाज अलीच्या ‘रॉकस्टार’मधील छोटासा रोल असो वा ‘कारवान’ आणि ‘टाइम मशीन’सारखे सिनेमे – त्याने प्रत्येक ठिकाणी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
हे पण वाचा.. “प्रियाच्या जाण्यानंतर तिच्या आठवणींसह पुढे जाणं..शंतनू मोघेची भावनिक प्रतिक्रिया कामच तिच्यासाठी खरी श्रद्धांजली”
‘दशावतार’च्या यशानंतर सिद्धार्थ मेनन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या चर्चेत आला आहे. बाबुलीच्या मुलाची भूमिका साकारताना त्याने दाखवलेली परफॉर्मन्स रेंज प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनाही भावली आहे. या भूमिकेमुळे त्याचा चाहता वर्ग आणखी वाढला असून तो सध्या मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या अभिनेत्यांपैकी एक ठरत आहे.
Siddharth Menon हा आज मराठीतील एक वेगळा चेहरा आहे, जो मूळचा साऊथ इंडियन असला तरी हृदयाने आणि कामगिरीने पूर्णपणे मराठी बनलाय. त्याचा हा प्रवास अनेक तरुण कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
हे पण वाचा..करिअरमध्ये पुढे जायचं असेल तर मर्यादा मोडाव्या लागतात – सई ताम्हणकरचा स्पष्ट दृष्टिकोन









