karan tacker sangharsh 7 varsh kam naslyaane gharbaslya anubhav : हिंदी टेलिव्हिजनमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता karan tacker पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लोकप्रिय शो “एक हजारों में मेरी बहना है” मुळे त्याला अपार लोकप्रियता मिळाली होती. मात्र या यशानंतर त्याच्या करिअरमध्ये असा टप्पा आला की कामच मिळेनासं झालं. अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत करणने आपल्या त्या कठीण दिवसांची आठवण करून दिली.
करण सांगतो की, मालिकेचं यश असूनही पुढे त्याला स्थिरता जाणवत नव्हती. म्हणूनच त्याने छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्याकडे जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. मात्र, चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण करणं सोपं नव्हतं. जवळजवळ सात वर्षांचा संघर्ष त्याने केला. यामध्ये तीन वर्षे तो पूर्णपणे घरीच बसलेला होता. “त्या काळात मी छोटी-मोठी कामं करत दिवस ढकलत होतो. पण जेव्हा कुठलंही काम नसायचं, तेव्हा मन खचून जायचं. नकारात्मक विचार यायचे. छोटीशी गोष्टसुद्धा मनाला लागायची,” असं तो सांगतो.
karan tacker या काळात अनेक चित्रपटांच्या ऑडिशन्स देत होता, पण संधी मिळत नव्हती. अशावेळी त्याने संयम राखत स्वतःला मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि तो “स्पेशल ऑप्स २” या वेब सीरिजमध्ये झळकला. या भूमिकेमुळे प्रेक्षकांनी पुन्हा त्याला पसंती दिली.
हे पण वाचा.. “‘ये रिश्ता…’ फेम रोहित पुरोहितच्या घरी बाळाचं आगमन, पत्नी शीना बजाजने दिली गुड न्यूज”
यापूर्वी तो अनुपम खेर यांच्या निर्मितीतील “तन्वी” चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो न्यू यॉर्कपर्यंत गेला होता. या प्रवासाने त्याला अभिनय कारकिर्दीत वेगळा आत्मविश्वास दिला.
आज karan tacker या संघर्षकाळाकडे मागे वळून पाहतो आणि सांगतो की, “काम नसलं, अपयश आलं तरी हार मानू नका. सातत्य ठेवलं तर एक दिवस नक्कीच योग्य संधी मिळते.” त्याचा हा प्रवास सध्या अनेक तरुण कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
हे पण वाचा.. ‘लग्नानंतर दीड वर्षांनी अभिनेत्री Sonarika Bhadoria कडून गुडन्यूज; गरोदरपणाची पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली आनंदची बातमी









