veen doghatli hi tutena swanandi bhavuk promo : झी मराठीवरील नवी मालिका “Veen Doghatli Hi Tutena” प्रेक्षकांच्या मनात दिवसेंदिवस आपली वेगळी छाप निर्माण करत आहे. या मालिकेत तेजश्री प्रधान (स्वानंदी) आणि सुबोध भावे (समर) यांची प्रमुख भूमिका असून, त्यांच्या अभिनयामुळे कथा अधिक रंगतदार होताना दिसते. नुकताच या मालिकेचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, ज्यामुळे कथानकाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या प्रोमोमध्ये स्वानंदी आपल्या आईशी बोलताना भावूक होताना दिसते. समाजात वय वाढलं की मुलीचं लग्न झालंच पाहिजे, या ठरावीक मानसिकतेवर ती संताप व्यक्त करते. स्वानंदी म्हणते, “लग्न हा इतकाच क्रायटेरिया आहे का? माझं शिक्षण, माझं काम, माझं योगदान याला काही किंमत नाही का? मलाही संसार करायचा आहे, पण माझं लग्न ठरत नाहीये यात माझा काय दोष?” हे बोलताना तिच्या डोळ्यांत अश्रू येतात आणि ती आपल्या वेदना व्यक्त करते.
हा संवाद पाहून नेटकरी अक्षरशः भारावून गेले आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी तेजश्री प्रधानच्या अभिनयाचं मनापासून कौतुक केलं आहे. “तेजश्री खूप गुणी अभिनेत्री आहे”, “स्वानंदीचं बोलणं अगदी खरं आहे”, “मनाला भिडणारं अभिनय”, “तू अप्रतिम आहेस तेजू” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया चाहत्यांकडून उमटत आहेत.
हे पण वाचा.. आदिश वैद्य पुन्हा प्रेमात? रेवती लेलेसोबतचं नातं संपल्यानंतर आता पुजा काकुर्डेसोबत चर्चेत
कथानकात अधिरा आणि रोहनच्या प्रेमामुळे निर्माण झालेली लग्नाची अडचण, त्यातून स्वानंदीवर आलेला दबाव आणि समाजाच्या नजरा हे सर्व एकत्रितपणे मालिकेची कथा अधिक गुंतागुंतीची आणि वास्तवदर्शी करत आहेत.
“Veen Doghatli Hi Tutena” या मालिकेत दाखवण्यात आलेला हा प्रसंग केवळ मालिकेपुरता मर्यादित न राहता, प्रत्यक्ष आयुष्यात अनेक मुलींना भेडसावणाऱ्या समस्येवर भाष्य करत असल्याचंही प्रेक्षकांना वाटत आहे. म्हणूनच हा प्रोमो प्रेक्षकांच्या मनाला भिडला आहे आणि पुढच्या भागात नक्की काय घडणार, याची उत्कंठा आता आणखी वाढली आहे.
हे पण वाचा.. “रेश्मा शिंदे आणि ऑनस्क्रीन जाऊबाईचा ठुमक-ठुमक डान्स व्हायरल; नेटकऱ्यांनी केलं कौतुक”









