ADVERTISEMENT

“१ वर्ष ५ महिन्यांचा प्रवास… आता ‘Lakhat Ek Amcha Dada’ मालिका बंद अभिनेत्रीच्या भावूक पोस्टने वाढवल्या चर्चा

lakhat ek amcha dada serial band zali :
lakhat ek amcha dada serial band zali

lakhat ek amcha dada serial band zali : मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेली ‘Lakhat Ek Amcha Dada’ ही झी मराठीवरील मालिका गेल्या दीड वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ८ जुलै २०२४ रोजी सुरू झालेली ही मालिका कमी वेळातच घराघरात पोहोचली. अभिनेता नितीश चव्हाणने साकारलेला सूर्या दादा हा व्यक्तिरेखा तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्याच्या अभिनयाला मिळालेलं प्रेक्षकांचं प्रेम सोशल मीडियावर अनेकदा झळकतं.

तथापि, या मालिकेचं भवितव्य सध्या चर्चेत आलं आहे. यंदाच्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात या मालिकेला एकही नॉमिनेशन न मिळाल्यानं चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती. यावरूनच अनेकांनी ‘Lakhat Ek Amcha Dada’ ही मालिका संपणार असल्याचा अंदाज वर्तवला.

या चर्चेला आणखी हवा मिळाली ती म्हणजे मालिकेत राजश्रीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ईशा संजय हिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे. ईशाने नुकतंच एक भावनिक लिखाण शेअर करताना लिहिलं, “राजश्रीच्या भूमिकेसाठी शेवटचं तयार होताना मन भरून आलंय. आता फक्त आठवणी कायमस्वरुपी राहणार आहेत. डोळ्यात पाणी आलंय आणि हात थंड झालेत. १ वर्ष ५ महिने झाले… आता राजश्रीच्या भूमिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेते. Lakhat Ek Amcha Dada… Signing Off As Raju”.

तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आम्ही तुला मिस करू”, “तुझं पात्र आमच्यासाठी खास होतं” अशा कमेंट्सनी ईशाच्या पोस्टला भरभरून प्रतिसाद दिला.

आता खरी उत्सुकता अशी आहे की मालिका खरोखरच संपणार आहे का, की फक्त ईशा संजय हिचं पात्र मालिकेतून बाहेर पडतंय? यावर मात्र अद्याप झी मराठी वाहिनीने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे मालिकेच्या भवितव्याबाबत अनिश्चितता कायम आहे.

हे पण वाचा.. स्टार प्रवाहवर सुरू होणार ‘काजळमाया’ हॉरर थ्रिलर मालिका Star Pravah Kajalmaya New SerialChavanचा फोटो व्हायरल”

दरम्यान, ‘Lakhat Ek Amcha Dada’ या मालिकेत नितीश चव्हाण, मृण्मयी गोंधळेकर, गिरीश ओक, कोमल मोरे, समृद्धी साळवी, जुई तनपुरे, ईशा संजय यांसह अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत. सायंकाळी ६ वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेने अनेक घरांमध्ये आपलं खास स्थान निर्माण केलं आहे.

प्रेक्षक मात्र सध्या एकाच प्रश्नाने व्याकुळ झाले आहेत – ही मालिका आता खरोखरच थांबतेय का?

हे पण वाचा.. स्टार प्रवाहवर सुरू होणार ‘काजळमाया’ हॉरर थ्रिलर मालिका Star Pravah Kajalmaya New Serial

lakhat ek amcha dada serial band zali