ADVERTISEMENT

“‘वहिनी आल्या का?’ नेटकऱ्यांचा प्रश्न; शेजारी उभी ‘ती’ कोण Suraj Chavanचा फोटो व्हायरल”

suraj chavan photo vahini afva : 'बिग बॉस मराठी' फेम Suraj Chavan पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकत्याच शेअर केलेल्या साऊथ इंडियन लूकमधील फोटोमध्ये त्याच्या शेजारी एक रहस्यमय मुलगी दिसत आहे. चेहरा झाकलेली ही 'ती' नेमकी कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडला असून, सोशल मीडियावर "वहिनी आल्या का?" अशा कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
suraj chavan photo vahini afva

suraj chavan photo vahini afva : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे घराघरात पोहोचलेला आणि चाहत्यांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केलेला Suraj Chavan पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर टाकलेला एक फोटो व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

या नव्या फोटोमध्ये Suraj Chavan साऊथ इंडियन लूकमध्ये दिसतोय. पारंपरिक पोशाखात झळकणाऱ्या सूरजच्या शेजारी एक मुलगी उभी असून तिचा चेहरा मात्र दिसत नाही. हिरव्या बांगड्यांचा चुडा, सुंदर साडी, केसात गजरा अशा लूकमध्ये ती मुलगी सजलेली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सूरजने फक्त लव्ह इमोजी टाकल्याने चाहत्यांचा संभ्रम आणखी वाढला आहे.

या रहस्यमय पोस्टनंतर चाहत्यांनी लगेचच सूरजच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल वेगवेगळे तर्क बांधायला सुरुवात केली. “भाऊ आता ऐकत नाही”, “वहिनी आल्या”, “अभिनंदन सूरज दादा”, “ही कोण आहे?” अशा अनेक प्रतिक्रिया कमेंट्समध्ये उमटल्या. इतकंच नाही तर त्याचा मित्र महेश जगदाळेनेही या फोटोवर “तुम्ही सगळे अभिनंदन करू शकता, हे स्वप्न नाहीये बरं का…” अशी कमेंट करून चर्चेला अजून रंगत आणली.

गमतीची बाब म्हणजे याआधीही Suraj Chavan ने आपल्या साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर केला होता. मात्र शेवटी तो केवळ स्वप्न असल्याचं समोर आलं. त्यामुळे आता चाहत्यांचा प्रश्न आहे की, हा फोटो खरोखर त्याच्या आयुष्यातील खास क्षणाचा भाग आहे का, की ही फक्त एखाद्या नव्या प्रोजेक्टची झलक आहे?

हे पण वाचा.. स्टार प्रवाहवर सुरू होणार ‘काजळमाया’ हॉरर थ्रिलर मालिका Star Pravah Kajalmaya New Serial

सध्या या पोस्टवर हजारो कमेंट्स येत आहेत आणि चाहत्यांचा कयास लावण्याचा खेळ सुरूच आहे. तथापि, सूरजकडून किंवा त्याच्या टीमकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे ही रहस्यमय मुलगी नेमकी कोण आणि सूरजच्या आयुष्यात तिचं स्थान काय, हे लवकरच स्पष्ट होईल अशीच चाहत्यांची अपेक्षा आहे.

दरम्यान, बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर Suraj Chavan दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या झापुक झुपूक सिनेमात झळकला होता. मात्र, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही. तरीसुद्धा, त्याची लोकप्रियता अजूनही तशीच टिकून आहे आणि त्याच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचे बारकाईने लक्ष लागलेले दिसते.

हे पण वाचा.. ऐश्वर्या नारकरांचा रंगभूमीवर कमबॅक! अविनाश नारकरांसोबत नवे नाटक शेवग्याच्या शेंगा Aishwarya Narkar Natak

suraj chavan photo vahini afva