lalit prabhakar nastik mulakhatiat vichar : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता Lalit Prabhakar नुकताच ‘आरपार’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अभिनयाच्या प्रवासात स्वतःची वेगळी छाप सोडणारा ललित, अलीकडेच दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे.
‘मिर्ची मराठी’ला दिलेल्या खास मुलाखतीत त्याने स्वतःच्या वैचारिक प्रवासाबद्दल स्पष्टपणे मांडणी केली. कलाकार म्हणून मोठं व्हायला स्वातंत्र्य किती महत्त्वाचं आहे, असा प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला, “मी नास्तिक झालो, पण हे कोणाच्या प्रभावामुळे नाही. शाळेत असतानाच काही गोष्टी वाचल्या आणि प्रश्न विचारायला लागलो. तेव्हाच जाणवलं की मला सगळं डोळे झाकून मान्य करायचं नाही. समजावून सांगितलं तर मी मान्य करीन, पण कुणी सांगितलं म्हणून मी गोष्ट पाळणार नाही.”
ललित प्रभाकरने पुढे सांगितले की, स्वातंत्र्य म्हणजे फक्त मोकळेपणा नसून त्यामागे मोठी जबाबदारी दडलेली असते. “मी अजूनही स्वतःला पूर्ण स्वातंत्र्य पकडता आलंय असं म्हणू शकत नाही. कारण माणूस आपल्याला सोयीस्कर वाटणारं स्वातंत्र्य सांगतो. पण मला स्वतःच्या व्याख्या ठरवून स्वतःला मर्यादित करायचं नाही. नवीन अनुभव घेण्यासाठी, शिकण्यासाठी मोकळं राहणं आवश्यक आहे.”
तो म्हणाला की, संस्थेत काम करताना देखील तो असा पहिला व्यक्ती असावा, ज्याने वेगळ्या संस्थांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. “एकाच पद्धतीचं काम करून आपण मर्यादित होतो. पण मला अधिक शक्यता तपासून बघायच्या आहेत. म्हणूनच मी स्वतःला बंदिस्त न ठेवता शोध घेण्याचा प्रयत्न करतो,” असे त्याने स्पष्ट केले.
हे पण वाचा.. ‘दशावतार’ चित्रपटाची कमाई झपाट्याने वाढली; दिलीप प्रभावळकरांच्या अभिनयाने प्रेक्षक मंत्रमुग्ध
अभिनयाच्या प्रवासात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या Lalit Prabhakar च्या या विचारांमुळे अनेक तरुण कलाकारांना नवी दिशा मिळू शकते. प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि मोकळेपणाने जगण्याचा दृष्टिकोन हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य ठरत आहे.
दरम्यान, ‘आरपार’ या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री हृता दुर्गुळेही प्रमुख भूमिकेत आहे. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आणि ललितचे विचार, या दोन्ही कारणांमुळे तो सध्या चर्चेत आहे.
हे पण वाचा.. सोनाली कुलकर्णीचा लेकीसोबत डान्स व्हिडीओ व्हायरल; २२ वर्षांपूर्वीच्या हिट गाण्यावर थिरकली मायलेकी









