tula japnar aahe maliketil vel badal : झी मराठी वाहिनीवरील मालिकांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल होणार का, असा प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडला आहे. कारण नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमानंतर चॅनेलने शेअर केलेल्या फोटोमुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या फोटोत ‘तुला जपणार आहे’ या मालिकेचा प्रोमो दिसत असून त्यावर प्रसारणाची वेळ सायंकाळी ६:३० वाजता नमूद करण्यात आली आहे.
गेल्या महिनाभरात झी मराठीने काही मोठे बदल केले होते. तेजश्री प्रधानची ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका सध्या रात्री ७:३० वाजता दाखवली जाते. तर, ‘लाखात एक आमचा दादा’ ६ वाजता, ‘सावळ्याची जणू सावली’ ६:३० वाजता आणि ‘पारू’ मालिका ७ वाजता प्रसारित होत आहे. यामुळे आधीच अनेक मालिकांची वेळ हलवण्यात आली होती.
दरम्यान, ‘तुला जपणार आहे’ ही थ्रिलर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला १७ फेब्रुवारी २०२५ रोजी आली. सुरुवातीपासूनच ही मालिका रात्री १०:३० वाजता दाखवली जाते. रहस्यपूर्ण कथानक आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे मालिकेला चांगली लोकप्रियता मिळत आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या नाशिक येथील एका कार्यक्रमात या मालिकेचा नवीन प्रोमो दाखवण्यात आला आणि त्यात वेळ ६:३० लिहिलेली दिसली. यामुळे सोशल मीडियावर लगेचच चर्चा रंगल्या.
चॅनेलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. “एकदा वेळ निश्चित ठरवा, सतत बदल का करताय?”, “सध्या ६:३० वाजता ‘सावलीची जणू सावली’ आहे, मग आता ती बंद होणार का?” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर उमटल्या.
हे पण वाचा.. अभिनेत्री Prajakta Parab हिचा साधेपणाचा सणासुदीतील अंदाज; बाप्पासाठी बनवले घरगुती नैवेद्य
याबाबत झी मराठीकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, फोटोमधील वेळेच्या उल्लेखामुळे प्रेक्षकांमध्ये गोंधळ उडाला आहे. त्यामुळे आता खरंच ‘तुला जपणार आहे’ मालिकेची वेळ बदलणार की एखाद्या प्रमोशनल कारणामुळे हा उल्लेख केला गेला होता, हे काही दिवसांत स्पष्ट होईल.
प्रेक्षकांसाठी मालिकांची वेळ अत्यंत महत्त्वाची ठरते. विशेषत: लोकप्रिय मालिका वेगळ्या वेळेत दाखवल्या गेल्या तर त्याचा थेट परिणाम TRP वर होऊ शकतो. त्यामुळे आता चॅनेल पुढे कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
हे पण वाचा.. घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेचा 500 वा भाग पूर्ण; निर्माते सोहम बांदेकर यांची भावूक प्रतिक्रिया









