hrishikesh shelar sneha kate marriage memories : मराठी टेलिव्हिजन आणि रंगभूमीवर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा Hrishikesh Shelar सध्या चर्चेत आहे. ‘शिकायला गेलो एक’ या नाटकात तो प्रेक्षकांसमोर येत असून अलीकडेच तो पत्नी स्नेहा काटेसह ‘आम्ही सारे खवय्ये’ या लोकप्रिय कार्यक्रमात झळकला. या दोघांच्या उपस्थितीने प्रेक्षकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचे काही खास क्षण अनुभवायला मिळाले.
झी मराठीच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये हृषिकेश आणि स्नेहा यांनी त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं. स्नेहा म्हणाली की, हृषिकेश एका ऑडिशनसाठी आला असताना ती आपल्या मैत्रीणीसोबत तिथे उपस्थित होती. त्यावेळी त्याने दिलेल्या ऑडिशनचा अभिनय तिला प्रचंड आवडला आणि मैत्रीणीला कानात सांगितलं, “हा मुलगा चांगला आहे, याची निवड नक्की होणार.” याच प्रसंगातून त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली आणि नंतर ती नातींमध्ये बदलली.
कार्यक्रमात हृषिकेश आणि स्नेहाने एकमेकांसाठी खास उखाणे घेतले. स्नेहाने गमतीशीर अंदाजात, “रोज सकाळी उठून खाल्लं पाहिजे अॅपल, हृषिकेशराव मी आपलं नातं आयुष्यभर जपलं” असा उखाणा घेतला. त्यावर हृषिकेशनेही आपल्या शैलीत उत्तर देत “स्नेहा आहे नागपूरची, तिच्या हातात संत्री; तीच आमच्या घराची एकमेव पालक मंत्री” असा भन्नाट उखाणा घेतला. या क्षणावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
यापूर्वीही Hrishikesh Shelar आणि स्नेहाने एका मुलाखतीत त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं होतं. त्यांच्या मते, पहिली भेट मुंबई विद्यापीठात झाली होती. त्या काळात ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते आणि नंतर ही मैत्री प्रेमात बदलली.
हे पण वाचा… अंकिता लोखंडेच्या पतीचा अपघात; विकी जैन रुग्णालयात दाखल, चाहत्यांमध्ये चिंतेच वातावरण
सध्या या दांपत्याला लग्नाला आठ वर्षे पूर्ण झाली असून त्यांना रुही नावाची गोड मुलगी आहे. अभिनयाच्या क्षेत्रात दोघेही सक्रिय आहेत. हृषिकेश जिथे नाटकं आणि मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो, तिथे स्नेहाने ‘एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर’ आणि ‘स्वराज्यजननी जिजामाता’ सारख्या मालिकांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.
‘आम्ही सारे खवय्ये’च्या मंचावर घेतलेले त्यांचे किस्से आणि उखाण्यांनी चाहत्यांना केवळ हसूच नाही तर प्रेमळ नात्याचं गोड उदाहरणही दिलं. Hrishikesh Shelar आणि स्नेहा काटेचं हे खास क्षण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
हे पण वाचा.. “कुशल बद्रिकेला स्वतःवरच पडला प्रश्न – ‘माझ्यात असं काय?’ पत्नी म्हणाली









