Ankita Lokhande husband accident : छोट्या पडद्यावर नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन सध्या चिंताजनक कारणामुळे चर्चेत आले आहेत. व्यवसायिक क्षेत्रातून अभिनयाकडे वळलेला विकी जैन काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातामुळे रुग्णालयात दाखल आहे.
विकी जैन सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार घेत असून, त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. काचांचे तुकडे लागल्यामुळे हाताला जवळपास ४५ टाके घालावे लागले आहेत. सोशल मीडियावर बिग बॉस फेम समर्थ जुरेलने शेअर केलेल्या व्हिडिओत विकी रुग्णालयाच्या बेडवर उपचार घेताना दिसतो. त्याच्यासोबतच अंकिता सतत त्याच्या शेजारी उभी राहून काळजी घेताना पाहायला मिळते.
समर्थ जुरेलने या व्हिडिओसोबत विकीसाठी शुभेच्छा देत लिहिलं – “मोठ्या भावा लवकर बरा हो, मेरे टोनी स्टार्क.” इतकंच नाही तर अभिनेत्री अशिता धवननेही रुग्णालयातील विकीसोबतचा फोटो शेअर करत त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.
याबाबत विकीचा आणखी एक जवळचा मित्र संदीप सिंहने माहिती देताना सांगितलं की, तीन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात विकीच्या हाताला गंभीर जखमा झाल्या. त्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.
या संपूर्ण प्रसंगात सर्वाधिक चर्चेत राहिली ती म्हणजे अंकिता लोखंडे. पतीच्या या संकटाच्या काळात ती खंबीरपणे त्याच्या सोबत उभी आहे. चाहत्यांना तिचं हे प्रेम आणि साथ पाहून भारावून जायला झालं आहे.
हे पण वाचा.. ‘सुपर डान्सर’मध्ये Shilpa Shetty चं भावूक क्षण; इंडस्ट्रीतील ३० वर्षांचा प्रवास खास सरप्राईजसह साजरा
अंकिता आणि विकी हे दोघेही अलिकडेच ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’ मध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आणि त्यावेळीही हे दाम्पत्य चर्चेत आलं होतं. मात्र आता विकीच्या अपघाताच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे.
सध्या डॉक्टरांकडून विकीच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. चाहत्यांनी आणि सेलिब्रिटी मित्रांनी सोशल मीडियावरून त्याच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हे पण वाचा.. ““कुशल बद्रिकेला स्वतःवरच पडला प्रश्न – ‘माझ्यात असं काय?’ पत्नी म्हणाली









