ADVERTISEMENT

“तुम्ही मालिकेत पाहता स्वानंदीला… पण बालपणी तिचं खरं नाव होतं अगदी वेगळंच!”

tejashree pradhan chinki navane olakh : मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री Tejashree Pradhan आज प्रत्येक घराघरात ओळखली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? बालपणी तिला वेगळ्याच टोपणनावाने हाक मारली जायची.
tejashree pradhan chinki navane olakh

tejashree pradhan chinki navane olakh : मराठी टेलिव्हिजन आणि सिनेमा क्षेत्रातील एक गाजलेलं नाव म्हणजे Tejashree Pradhan. विविधांगी भूमिका साकारत, भावपूर्ण अभिनयाने आणि आपल्या साध्या-सरळ व्यक्तिमत्त्वामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान मिळवलं आहे. आज ती लाखोंची लाडकी अभिनेत्री आहे.

सध्या झी मराठीवरील “वीण दोघांची तुटेना” या मालिकेत ती अभिनेत्री स्वानंदीच्या भूमिकेत झळकत आहे. तिच्यासोबत अभिनेता सुबोध भावे समरची भूमिका साकारताना दिसतो. या मालिकेतली स्वानंदीची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना इतकी भावते की, घराघरात ती हाक मारली जाते. मात्र खऱ्या आयुष्यात तेजश्रीला वेगळ्याच नावाने हाक मारली जात असे.

एका खास मुलाखतीत तिने स्वतः बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. ती सांगते की, “लहानपणी मला घरात आणि शेजाऱ्यांत ‘चिंकी’ या नावाने सगळे ओळखत. शाळेत किंवा खेळताना मित्रमैत्रिणी हाक मारायचे ते ह्याच नावाने. आज जरी मी प्रेक्षकांसाठी तेजश्री प्रधान असले तरी कुटुंबासाठी आणि लहानपणीच्या आठवणीत ‘चिंकी’ हेच नाव खास राहिलं आहे.”

कलाविश्वात आलेल्या तेजश्रीच्या प्रवासाकडे पाहिलं तर तिचा संघर्ष, मेहनत आणि अभिनय कौशल्य यामुळेच तिला आज प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. होणार सून मी ह्या घरची मालिकेतील जान्हवी असो किंवा अग्निहोत्र मालिकेतली भूमिका, प्रत्येक वेळेस तिने प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. त्यामुळेच तिचं नाव केवळ मराठी मालिकांपुरतं मर्यादित न राहता मोठ्या पडद्यावरही झळकत राहिलं आहे.

हे पण वाचा.. शुभविवाह फेम कुंजिका काळविंटने मालिकेला दिला निरोप; लवकरच आई होणार असल्याची दिली गुडन्यूज

आज Tejashree Pradhan सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तिच्या पोस्ट्सवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत असतात. मात्र तिच्या बालपणातील हे टोपणनाव ‘चिंकी’ ऐकून अनेक चाहत्यांना नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. कारण पडद्यावर स्वानंदी, जान्हवी किंवा अन्य दमदार भूमिका साकारणारी ही अभिनेत्री एकेकाळी छोट्याशा नावाने ओळखली जात होती.

खरं तर, हीच तिची साधेपणा आणि मोकळेपणा दर्शवणारी बाजू आहे, ज्यामुळे चाहत्यांच्या मनात तिचं वेगळं स्थान निर्माण झालं आहे.

हे पण वाचा.. बिग बॉस 19 : 19 वर्षांनी अर्शद वारसीचं पुनरागमन, सलमान खानऐवजी करणार सूत्रसंचालन