shilpa shetty bollywood 30 varsha : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री Shilpa Shetty हिने इंडस्ट्रीमध्ये तब्बल 30 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. या विशेष क्षणाला ‘सुपर डान्सर चॅप्टर 5’च्या टीमने एक आगळावेगळा सरप्राईज देत शिल्पाच्या आठवणींना उजाळा दिला. ‘मस्ती की पाठशाला’ या थीमनं सजलेल्या एपिसोडमध्ये तिच्या शालेय जीवनाशी निगडित व्हिडीओ दाखवण्यात आला आणि तो पाहून शिल्पा भावूक झाली.
या खास क्लिपमध्ये Shilpa Shettyच्या बालपणीचे फोटो, वर्गमित्रांच्या आठवणी, शिक्षकांचे संदेश आणि तिच्या शाळेच्या मुख्याध्यापिकांचे मनोगतही दाखवण्यात आले होते. आपल्या लहानपणीच्या आठवणी पुन्हा समोर आल्याने शिल्पाच्या डोळ्यांत पाणी आलं. भावनाविवश झालेल्या शिल्पाने स्वतःच्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितलं की, “खरं सांगायचं तर अजूनही मला विश्वास बसत नाही की माझ्या कारकिर्दीला ३० वर्षं पूर्ण झाली आहेत. मी जे काही मिळवलं, ते माझ्या कधीच अपेक्षेत नव्हतं. लोक जेव्हा म्हणतात की माझ्या प्रवासातून त्यांना प्रेरणा मिळते, तेव्हा मी स्वतःला भाग्यवान समजते.”
Shilpa Shetty ने पुढे सांगितलं की, तिच्यासाठी लोक तिला अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर एक चांगला माणूस म्हणूनही ओळखतात, हेच तिच्या आयुष्याचं खरं यश आहे. “शालेय दिवस हे आयुष्यातील सर्वात गोड आठवणी आहेत. त्या क्षणांना पुन्हा अनुभवणं हा माझ्यासाठी अमूल्य अनुभव होता,” असं ती म्हणाली.
हे पण वाचा.. Shilpa Shetty” आणि “Raj Kundra” यांच्यावर 60 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी Lookout Notice जारी
या एपिसोडमध्ये केवळ शिल्पाच्याच नाही, तर सहभागींच्या परफॉर्मन्समुळेही प्रेक्षकांना शाळेच्या आठवणींमध्ये रमायला मिळालं. हसणं-रडणं, मजा-मस्ती अशा सगळ्या रंगांनी सजलेला हा भाग प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारा ठरला.
शनिवार आणि रविवारी रात्री 8 वाजता प्रसारित होणाऱ्या या एपिसोडमध्ये Shilpa Shetty चं भावनिक रूप पाहायला मिळणार आहे. तिच्या 30 वर्षांच्या सिनेसफरीचा उत्सव आणि शाळेच्या आठवणींनी सजलेला हा भाग ‘सुपर डान्सर चॅप्टर 5’मधील संस्मरणीय क्षण म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करून राहील, यात शंका नाही.
हे पण वाचा.. गरोदरपणाच्या प्रश्नांनी कंटाळली अंकिता लोखंडे स्पष्ट शब्दांत दिलं माध्यमांना उत्तर म्हणाली-









