ADVERTISEMENT

भक्तांचा अपमान, धक्काबुक्की आणि दिरंगाई… ‘लालबागचा राजा’ मिरवणुकीबाबत Abhidnya Bhave Husband Mehul Pai यांची संतप्त पोस्ट”

लालबागचा राजा विसर्जनावेळी झालेल्या दिरंगाई, भक्तांचा अपमान आणि व्यवस्थापनातील गोंधळावर अभिनेत्री अभिज्ञा भावेचे पती Abhidnya Bhave Husband मेहुल पै यांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी व्हीआयपी सुविधा आणि सामान्य भक्तांना दिलेल्या त्रासाबद्दल मंडळावर गंभीर आरोप केले आहेत.
Abhidnya Bhave Husband Mehul Pai

देशभरात मोठ्या भक्तिभावाने साजरा झालेला गणेशोत्सव अनंत चतुर्दशीला पार पडला. मात्र, या उत्सवातील सर्वाधिक चर्चेत असलेला लालबागचा राजा विसर्जन सोहळा यंदा प्रचंड गोंधळात पार पडला. तब्बल ३६ तासांच्या दिरंगाईनंतर अखेर रविवारी रात्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. या दरम्यान भक्तांना झालेली धक्काबुक्की, मारहाण आणि अपमानामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात आता अभिनेत्री अभिज्ञा भावेचे पती Abhidnya Bhave Husband Mehul Pai यांनीही आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मंडळाच्या व्यवस्थापनावर कठोर शब्दांत टीका केली.

मेहुल यांनी लिहिलं की, “इतकं मोठं मंडळ, प्रचंड आर्थिक सामर्थ्य असूनसुद्धा सामान्य भक्तांना दिलेलं वागणं अत्यंत लाजिरवाणं होतं. एका बाजूला व्हीआयपींसाठी विशेष दर्शनाची सोय केली जाते, तर दुसऱ्या बाजूला सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण आणि अपमान सहन करावा लागतो. इतकंच नव्हे तर कोळी बांधवांना देखील दर्शन नाकारून त्यांचा अवमान करण्यात आला.”

त्यांनी पुढे नमूद केलं की, “राजा हा सर्वांचा असतो, त्याला भक्तीमध्ये कोणताही भेदभाव नसतो. पण या विसर्जनावेळी जे दृश्य दिसले, ते मनाला चटका लावणारे होते. राजा समुद्रात अधांतरी उभा असताना त्याच्या शेजारी मंडळाचे कार्यकर्ते नव्हते; मात्र कोळी बांधव तब्बल १२ तास राजाबरोबर खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांच्या मदतीमुळेच अखेर विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाली.”

मेहुल पै यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यवस्थापनाला थेट इशारा देत लिहिलं की, “आज कर्म देखील 5G नेटवर्कवर आहे. ज्याप्रमाणे आपण वागत आहोत त्याची फळं त्वरित मिळतात. भक्तांशी अपमानकारक वागणं हे कुठल्याही श्रद्धेचा भाग होऊ शकत नाही. त्यामुळे मंडळाने या घटनेतून धडा घ्यायला हवा.”

हे पण वाचा.. प्रियाची तुरुंगातून सुटकेसाठी धाडसी रिस्क, अर्जुन-सायलीमध्ये गैरसमजांचे वारे Tharala Tar Mag 10 September

अभिनेत्री अभिज्ञा भावेने (Abhidnya Bhave) देखील आपल्या इन्स्टाग्रामवर हीच पोस्ट शेअर करत नवऱ्याच्या मताला पाठिंबा दिला. त्यामुळे आता या प्रकरणावर अधिक चर्चा रंगली आहे.

लालबागचा राजा हा मुंबईतच नव्हे तर देशभरातील लाखो भक्तांचा श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. मात्र, यंदाच्या विसर्जनातील अव्यवस्था आणि भक्तांचा अपमान ही घटना निश्चितच चिंताजनक ठरली असून यामुळे सोशल मीडियावर संतापाचे वातावरण आहे.

हे पण वाचा.. ललितसोबत काम करताना कसं वाटलं? हृता दुर्गुळेने सांगितला खास अनुभव

Abhidnya Bhave Husband Mehul Pai इंस्टाग्राम पोस्ट