ADVERTISEMENT

ललितसोबत काम करताना कसं वाटलं? हृता दुर्गुळेने सांगितला खास अनुभव

hruta durgule shares experience working with lalit prabhakar : लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता ललित प्रभाकर लवकरच ‘आरपार’ या रोमँटिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कामाच्या अनुभवाबद्दल बोलताना हृता म्हणाली की, “ललितपेक्षा उत्तम सहकलाकार असूच शकत नाही.”
hruta durgule shares experience working with lalit prabhakar

hruta durgule shares experience working with lalit prabhakar : मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच नवे विषय आणि ताज्या जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि देखणा अभिनेता ललित प्रभाकर ही अशीच एक जोडी लवकरच ‘आरपार’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्यावर प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांनी एकमेकांसोबत काम करण्याचा अनुभव नुकताच एका मुलाखतीत शेअर केला. हृता दुर्गुळे म्हणाली की, “मला खूप दिवसांपासून ललितसोबत काम करण्याची इच्छा होती. मात्र योग्य प्रोजेक्ट मिळत नव्हता. कधी त्याला काही स्क्रिप्ट पसंत नव्हतं, तर कधी मला. पण ‘आरपार’साठी आम्ही जणू थांबलो होतो. हा चित्रपट करताना मला जाणवलं की, ललितपेक्षा चांगला सहकलाकार असूच शकत नाही. तो उत्कृष्ट अभिनेता आहेच, पण त्याचं प्रामाणिकपणं आणि कामाकडे पाहण्याची वृत्ती प्रेरणादायी आहे.”

दुसरीकडे, ललित प्रभाकरनेही हृता दुर्गुळेबद्दल कौतुक व्यक्त केलं. तो म्हणाला, “शूटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच आम्ही एकमेकांसोबत खूप कंफर्टेबल होतो. कारण आमच्या दोघांचाही कामाकडे पाहण्याचा दृष्टीकोन खूप सारखा आहे. प्रोजेक्टबद्दल असलेली समर्पित भावना आणि जबाबदारी दोघांचीही सारखीच होती. त्यामुळे आमची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री अधिक खुलली.”

हे पण वाचा.. नेहा पेंडसेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल चाहते म्हणाले असा बोल्ड अंदाज कधी पाहिलाच नाही!

ललितने पुढे सांगितले की, “मला खूप दिवसांपासून एका अर्थपूर्ण रोमँटिक चित्रपटाची वाट पाहत होतो. पण ती लव्हस्टोरी आजच्या काळाशी निगडीत असावी, प्रेक्षकांना भिडावी अशी माझी अपेक्षा होती. शेवटी ‘आरपार’च्या स्क्रिप्टमध्ये हे सगळं मिळालं. म्हणून हा प्रोजेक्ट माझ्यासाठी खास आहे.”

आता हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकरची ही नवी जोडी १२ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘आरपार’मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ट्रेलरनंतर चाहत्यांच्या अपेक्षा अधिक वाढल्या असून या सिनेमातील त्यांची केमिस्ट्री किती प्रभावी ठरणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

हे पण वाचा.. अभिनेत्री निक्की तांबोळी हिने प्रियकर  अरबाज पटेलसाठी सोशल मीडियावर लिहिलेली  पोस्ट चर्चेत..”Among 8 billion, you are..