ADVERTISEMENT

झाकीर खान ने घेतला मोठा निर्णय; आरोग्याच्या कारणामुळे स्टँडअप शोपासून मोठा ब्रेक

भारताचा लोकप्रिय कॉमेडियन Zakir Khan याने चाहत्यांना धक्का देत स्टँडअप शोपासून काही काळासाठी ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे. सततचे दौरे, व्यस्त वेळापत्रक आणि बिघडतं आरोग्य हीच या निर्णयामागची मोठी कारणं असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.
zakir khan break from standup shows

zakir khan break from standup shows : भारतातील स्टँडअप कॉमेडीच्या जगात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारा Zakir Khan पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळी कारण त्याच्या कॉमेडीपेक्षा वेगळं आहे. प्रेक्षकांना नेहमी हसवणारा हा ‘सख्त लौंडा’ आता काही काळासाठी स्टँडअप शोपासून दूर जाणार आहे. त्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत हा मोठा निर्णय जाहीर केला असून त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये निराशेची भावना पसरली आहे.

झाकीर खानने आपल्या निवेदनात सांगितलं की, गेल्या दहा वर्षांपासून तो सतत देश-विदेशातील दौऱ्यांमध्ये व्यस्त होता. दिवसातून अनेक शो, प्रवास, रात्री झोपेचा अभाव आणि अनियमित आहार यामुळे त्याच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. तो म्हणाला, “लोकांना हसवणं हीच माझी खरी ताकद आहे, पण मागील एका वर्षापासून माझ्या तब्येतीवर त्याचा नकारात्मक परिणाम जाणवतोय. मी सतत हा ब्रेक टाळत होतो, पण आता डॉक्टरांनीच मला आराम करण्याचा सल्ला दिला आहे.”

झाकीर खानने हेही स्पष्ट केलं की त्याला स्टेजवर प्रेक्षकांसमोर उभं राहायला प्रचंड आवडतं. त्याच्यासाठी तो एक वेगळाच अनुभव असतो. पण या वेळी आरोग्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. त्याच्या मते, हा निर्णय कठीण असला तरी आवश्यक आहे.

तो पुढे म्हणाला की, येत्या काळात तो आपल्या परफॉर्मन्सची संख्या मर्यादित ठेवणार आहे. 24 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ‘पापा यार टूर’ अंतर्गत तो निवडक शहरांतच परफॉर्म करेल. ही टूर 11 जानेवारी 2026 पर्यंत चालणार असली तरी शोपेक्षा त्याचा भर आरोग्यावर असेल. त्याने चाहत्यांना आश्वासन दिलं की, नवीन शो रेकॉर्ड झाल्यानंतर तो मोठा ब्रेक घेईल आणि त्यानंतर आणखी जोमाने परत येईल.

हे पण वाचा.. Shilpa Shetty” आणि “Raj Kundra” यांच्यावर 60 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी Lookout Notice जारी

झाकीर खानचे लाखो चाहते या निर्णयामुळे निराश झाले असले तरी त्याच्या आरोग्याची काळजी घेणं अधिक महत्त्वाचं असल्याचं सोशल मीडियावरील प्रतिक्रिया स्पष्ट करतात. अनेक चाहत्यांनी त्याला साथ देत “तू तंदुरुस्त असशील तरच आम्हाला खऱ्या अर्थाने आनंद देता येईल” अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून भारतात लोकप्रियता मिळवून जागतिक स्तरावर नाव कमावलेला Zakir Khan याचा हा निर्णय त्याच्या करिअरसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आता तो पुन्हा कधी आणि कसा परततो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

हे पण वाचा.. बिग बॉस १९ मध्ये अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री? सोशल मीडियावर व्हायरल झाला मजेदार व्हिडीओ

zakir khan break from standup shows :