Kishori Shahane shared her filmy love story :- मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी अलीकडेच आपली खास आठवण सांगितली. सहजसुंदर व्यक्तिमत्त्व, दमदार अभिनय आणि खुल्या स्वभावामुळे त्यांची खास ओळख आहे. पण यावेळी त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक फिल्मी किस्सा चाहत्यांशी शेअर केला आहे.
झी मराठीवरील ‘आम्ही सारे खवय्ये – जोडीचा मामला’ या कार्यक्रमात किशोरी शहाणे आपल्या पती दिपक बलराज यांच्यासह हजेरी लावली होती. या खास एपिसोडमध्ये त्यांनी त्यांच्या प्रेमकथेचा उल्लेख केला. किशोरी शहाणे यांनी सांगितलं की, त्यांच्या आणि दिपक यांच्या ओळखीला साधारण तीन-चार वर्षे झाली होती. या काळात दोन्ही कुटुंबांमध्येही जवळीक वाढली होती. एकदा त्यांच्या बहिणीने थेट प्रश्न केला – “तू दिपकशी लग्न करणार आहेस का?” त्यावर किशोरीने हसत उत्तर दिलं, “करू शकते का?” आणि त्याच क्षणी बहिणीने त्यांना सल्ला दिला की दिपकला लगेच विचारावं.
त्या रात्री घड्याळात ११ वाजले होते. किशोरी शहाणे यांनी तत्काळ फोन उचलला आणि दिपकला थेट प्रश्न विचारला – “तुम्ही माझ्याशी लग्न करणार का?” हा अनपेक्षित प्रश्न ऐकून दिपक काही क्षण गोंधळले आणि म्हणाले, “आपण उद्या भेटणारच आहोत, तेव्हा बोलू.” पण किशोरीने आग्रह धरून आपली इच्छा स्पष्ट केली. त्यांच्या या स्पष्ट स्वभावामुळेच या नात्याने पुढे सुंदर वळण घेतलं.
या प्रेमकथेच्या मागे बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचाही एक हात आहे. दिपक बलराज ‘हप्ता बंद’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत होते आणि त्यांना एका मराठी चेहऱ्याची गरज होती. जॅकी श्रॉफ यांनी किशोरी शहाणे यांचं नाव सुचवलं आणि तिथूनच दोघांची पहिली भेट झाली. फिल्मिस्तान स्टुडिओत झालेल्या त्या पहिल्या भेटीतच किशोरीला चित्रपटासाठी निवडलं गेलं आणि तिथून त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली.
हे पण वाचा.. “‘ट्रोलिंग आधी स्वतःपासून सुरू करा’; प्रथमेश परब पत्नी क्षितीजा घोसाळकरची स्पष्ट प्रतिक्रिया”
‘हप्ता बंद’च्या शूटिंगदरम्यान रोजच्या भेटींमुळे त्यांच्या नात्यातील आपुलकी वाढत गेली. हळूहळू ही मैत्री प्रेमात परिवर्तित झाली. पुढे त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि कुटुंबीयांच्या संमतीने ही जोडी विवाहबंधनात अडकली.
किशोरी शहाणे आणि दिपक बलराज यांची ही फिल्मी पण हृदयस्पर्शी प्रेमकथा आज चाहत्यांना प्रेरणा देणारी ठरते. त्यांचा परस्परांवरील विश्वास, स्पष्ट संवाद आणि एकमेकांना दिलेला पाठिंबा यामुळेच त्यांचं नातं अधिक घट्ट झालं आहे.
हे पण वाचा.. “Tu Hi Re Majha Mitwa” मालिकेतून स्वाती चिटणीस यांचा एक्झिट;कोण? करणार नवी एन्ट्री









