ADVERTISEMENT

बँक बॅलेन्सच्या दुप्पट मानधनाची ऑफर मिळूत असूनही अमृता सुभाषने नाकारली भूमिका?..म्हणाली-

लोकप्रिय अभिनेत्री अमृता सुभाष हिला एका भूमिकेसाठी बँक बॅलेन्सच्या दुप्पट मानधनाची ऑफर मिळाली होती. तरीसुद्धा तिने हा प्रोजेक्ट नाकारला. मुलाखतीत तिने यामागचं खरं कारण उघड केलं आहे.
Amruta Subhash role rejection

Amruta Subhash role rejection : मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने छाप पाडणारी अभिनेत्री अमृता सुभाष ही नेहमीच वेगळ्या भूमिकां मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. प्रेक्षकांना प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काहीतरी नवं देण्याची तिची निपुणता चाहत्यांना भावते. त्यामुळे तिला वेब सीरिजपासून ते सिनेमांपर्यंत विविध माध्यमांतून नेहमी वेग वेगळ्या भूमिकांच्या ऑफर्स मिळतात. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमृताने असे स्पष्ट केले की, एका भूमिकेसाठी तिला स्वतःच्या बँक बॅलेन्सच्या दुप्पट मानधनाची ऑफर मिळाली होती, तरीही तिने त्या प्रोजेक्टला नकार दिला.

अमृता सुभाष मनी कंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “एखादी भूमिका गाजली की तशाच पद्धतीच्या ऑफर्स वारंवार येत राहतात. कलाकारांना टाईपकास्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळेच मी अशा भूमिका नाकारल्या आहेत, ज्या भुमिका मला आर्थिक दृष्ट्या  फायदेशीर ठरल्या असत्या. माझ्या सध्याच्या बँक बॅलेन्सपेक्षा दुप्पट पैसे मला मिळणार होते, पण त्या भूमिकेत काहीच नावीन्य नव्हतं. त्यामुळे मी सरळ नकार दिला.”

अमृताचा ठाम विश्वास आहे की कलाकाराने केवळ पैशासाठी भूमिका करू नये. ती पुढे म्हणाली, “जर कंटेंट चांगला असेल तर प्रोडक्शन किती मोठं किंवा छोटं आहे, याचा मी विचार करत नाही. मी ‘जारण’सारख्या छोट्या प्रोडक्शनच्या सिनेमात काम केलं आहे. त्यांच्याकडे माझ्या मानधनाइतके पैसे नव्हते, पण तरीही मी तो प्रोजेक्ट केला कारण त्याचा कंटेंट खूप मजबूत होता. कलाकार म्हणून मला समाधान देणं ही माझ्यासाठी प्राधान्याची गोष्ट आहे.”

हे पण वाचा.. नारायणी शास्त्रीचा भीक मागतानाचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना बसला धक्का काय आहे व्हिडीओ मागील सत्य?

अमृता सुभाष ही एक बहुगुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘गली बॉय’, ‘रॉकेट बॉयज’, ‘सेक्रेड गेम्स’, ‘माधवनचा १२वीचा सिनेमा’ यांसारख्या हिंदी प्रोजेक्ट्समध्ये तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तर मराठीत ‘श्वास’, ‘आस्तु’, ‘नील पावसाचं आकाश’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची ताकद सिद्ध केली. पैशापेक्षा कामाची गुणवत्ता आणि कलात्मक समाधान यांना तिने नेहमीच प्राधान्य दिलं आहे.

कलाकारांसाठी लोकप्रियता, पैसा आणि संधी यांचा मोह मोठा असतो. मात्र अमृता सुभाष याने सिद्ध केलं की खरी कलाकारिता ही कंटेंटवर आधारित असते. पैशाच्या मोहाला न जुमानता, तिने निवडक आणि सबळ भूमिकांचा मार्ग निवडला आहे. त्यामुळेच ती आज मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वतःचं स्वतंत्र आणि वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.

हे पण वाचा… शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये, सातवा हप्ता लवकरच वितरित होणार

अमृता सुभाष इंस्टाग्राम पोस्ट..