ADVERTISEMENT

नवरी मिळे हिटलरला’ फेम आलापिनी निशाळसोबत छेडछाड; सोशल मीडियावर शेअर केली घटना

Aalapini Nisal incident :‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आलापिनी निशाळ छेडछाडीची शिकार झाली. तीन दुचाकींवर सहा जणांनी शिट्ट्या वाजवत तिची खिल्ली उडवली. या घटनेचा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर करत संताप व्यक्त केला.
Aalapini Nisal incident

Aalapini Nisal incident : मुंबईत सध्या गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू आहे. रात्रभर रस्त्यांवर गर्दी, बाप्पाची पूजा-अर्चा आणि उत्सवाचं वातावरण अनुभवायला मिळतं. मात्र या सणाच्या गर्दीतही काहीजणांच्या विकृत वागण्यामुळे वातावरण खराब होतं. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आलापिनी निशाळ अशाच अप्रिय घटनेची शिकार झाली असून तिने स्वतः हा प्रसंग सोशल मीडियावर मांडला आहे.

आलापिनी निशाळने सांगितलं की ती रात्री उशिरा गाडीतून जात असताना तीन दुचाकींवर सहा जण तिच्या मागे येत होते. “गाडी चालवताना ते सतत बोलत होते. मी त्यांना ओव्हरटेक केलं तेव्हा मला माहित होतं की आता हॉर्न वाजवतील. मग त्यांनी ‘बघ की इकडेऽऽ… ये पाव्हणी’ असं म्हणत शिट्टी वाजवली. मी मागे वळून पाहिलं तर ते काही झालंच नाही अशा बेताल आविर्भावात पुढे निघून गेले,” असं अभिनेत्रीने लिहिलं. पुढे ती म्हणाली की, या घटनेनंतर ती थेट घरी आली आणि किती वेळ बाप्पाच्या मूर्तीसमोर बसली हे तिलाही कळलं नाही.

या अनुभवाने संतापलेली आलापिनी निशाळने आपली व्यथा सोशल मीडियावर शेअर केली. तिच्या पोस्टनंतर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद आला असून अनेकांनी तिच्या धैर्याचं कौतुक करत तिला मानसिक आधार दिला आहे. दुसरीकडे, अशा तरुणांच्या वागणुकीविरोधात लोकांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे.

हे पण वाचा.. गायक राहुल देशपांडेचा घटस्फोट, १७ वर्षांच्या सहजीवनानंतर पत्नीपासून विभक्त..

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेमुळे आलापिनी निशाळला चांगली प्रसिद्धी मिळाली. मालिकेतल्या भूमिकेसोबतच तिचे नृत्याचे व्हिडीओसुद्धा चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. मुख्य अभिनेत्री वल्लरी विराजसोबत ती अनेकदा डान्स व्हिडीओ शेअर करताना दिसते. अभिनयासोबतच आलापिनी एक उत्तम नृत्यांगना म्हणूनही ओळखली जाते.

या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गर्दीच्या वातावरणातसुद्धा स्त्रियांना त्रास देणारे प्रकार थांबलेले नाहीत हे या उदाहरणातून स्पष्ट होतं. आलापिनी निशाळच्या धैर्यामुळे मात्र ही घटना उघडकीस आली आणि समाजासमोर महिलांना भेडसावणाऱ्या वास्तव समस्येची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे.

हे पण वाचा.. Star Pravah serial update : अवघ्या ९ महिन्यांत संपणार लोकप्रिय मालिका, १५ सप्टेंबरपासून वाहिनीवर मोठा बदल

Aalapini Nisal incident इंस्टाग्राम पोस्ट.