ADVERTISEMENT

गायक राहुल देशपांडेचा घटस्फोट, १७ वर्षांच्या सहजीवनानंतर पत्नीपासून विभक्त..

Singer Rahul Deshpande Announces Divorce प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी सोशल मीडियावर घोषणा करत पत्नी नेहापासून १७ वर्षांच्या सहजीवनानंतर विभक्त झाल्याचं सांगितलं. मुलगी रेणुकासाठी दोघेही सह-पालक म्हणून जबाबदाऱ्या निभावणार आहेत.
Singer Rahul Deshpande Announces Divorce

Singer Rahul Deshpande Announces Divorce : मराठी शास्त्रीय संगीताच्या दुनियेत आपलं वेगळं स्थान निर्माण करणारे लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय चाहत्यांसोबत शेअर केला आहे.   इंस्टाग्राम वर पोस्ट  त्यांनी पत्नी नेहा देशपांडेसोबतचा घटस्फोट अधिकृतरीत्या जाहीर केला. या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांना ही बातमी अनपेक्षित धक्का देणारी ठरली आहे.

राहुल देशपांडे आणि नेहा देशपांडे यांनी १७ वर्षांचा संसार एकत्र घालवला. मात्र, सप्टेंबर २०२४ मध्ये परस्पर सहमतीने त्यांनी कायदेशीररित्या वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. जवळपास वर्षभर हा बदल स्वतःमध्ये स्वीकारल्यानंतर राहुल यांनी अखेर चाहत्यांशी याबद्दल खुलेपणाने बोलण्याचं ठरवलं.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना राहुल यांनी भावनिक शब्दांत आपल्या प्रवासाबद्दल सांगितलं. त्यांनी लिहिलं की, “प्रिय मित्रांनो, तुम्ही माझ्या प्रवासाचा एक महत्त्वपूर्ण भाग राहिलात. १७ वर्षांच्या सहजीवनानंतर नेहा आणि मी परस्पर सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आता आम्ही स्वतंत्र आयुष्य जगणार असलो तरी आई-वडील म्हणून आमचा बाँड कायम राहील.”

या पोस्टमध्ये राहुल यांनी आपल्या मुलगी रेणुकाचा विशेष उल्लेख केला. “रेणुका ही माझ्या आयुष्यातील सर्वोच्च प्राधान्य आहे. तिच्या हितासाठी मी आणि नेहा एकत्र सह-पालक म्हणून जबाबदाऱ्या पार पाडणार आहोत. तिला स्थिर, प्रेमळ आणि सुरक्षित वातावरण देणं हेच आमचं ध्येय आहे,” असं ते म्हणाले.

गायक राहुल देशपांडे यांनी पुढे नमूद केलं की, हा निर्णय त्यांनी घाईघाईत न घेता विचारपूर्वक स्वीकारला आहे. आपल्या चाहत्यांना व मित्रपरिवाराला ही बातमी सांगण्यापूर्वी थोडा वेळ स्वतःसाठी घेणं गरजेचं होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी चाहत्यांनी या काळात दाखवलेल्या समजूतदारपणाबद्दल आभारही मानले.

हे पण वाचा.. देवमाणूस’ फेम किरण गायकवाडने पत्नीसह शेअर केला खास व्हिडीओ; कॅप्शनने वेधले लक्ष

राहुल देशपांडे हे सध्याच्या पिढीतले आघाडीचे शास्त्रीय गायक असून त्यांच्या स्वरांनी रसिकांना नेहमीच मंत्रमुग्ध केलं आहे. त्यांचं व्यासपीठावरचं प्रभावी सादरीकरण, अभंग, भजन, तसेच आधुनिक संगीताच्या मैफिलींमधील कामगिरी विशेष गाजली आहे. मात्र, वैयक्तिक आयुष्यात त्यांनी घेतलेला हा मोठा निर्णय आता चर्चेचा विषय ठरत आहे.

१७ वर्षांचा प्रवास, असंख्य आठवणी आणि एकत्र घालवलेले क्षण मागे ठेवून राहुल व नेहा यांनी स्वतंत्र जीवनाचा नवा अध्याय सुरू केला आहे. तरीही, मुलीच्या संगोपनासाठी दोघेही एकत्रितपणे जबाबदारी पार पाडतील, हा संदेश त्यांनी देऊन चाहत्यांना सकारात्मक दृष्टी दिली आहे.

हे पण वाचा.. “Priya Marathe च्या आठवणीत Aastad Kale चं भावनिक पत्र – ‘कुठून आणलीस गं ही ताकद?’”

Singer Rahul Deshpande Announces Divorce इंस्टाग्राम पोस्ट..