ADVERTISEMENT

प्रिया मराठेच्या निधनानंतर Abhijeet Khandkekar भावुक; “शंतनू, तू ज्या धीराने…” म्हणत लिहिली आठवणींची पोस्ट

लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. तिच्या आठवणीत अभिनेता Abhijeet Khandkekar याने हृदयस्पर्शी पोस्ट शेअर करत शंतनू मोघेच्या धैर्याचं कौतुक केलं आहे.
Abhijeet Khandkekar

मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. वयाच्या केवळ ३८ व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला. गेल्या दोन वर्षांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती. ३१ ऑगस्टच्या पहाटे मीरारोड येथील राहत्या घरी प्रियाने अखेरचा श्वास घेतला. तिच्या जाण्याने केवळ कुटुंबीय आणि जवळचेच नव्हे, तर प्रेक्षक आणि सहकलाकारही हदरले आहेत.

चार दिवस सासूचे’, ‘या सुखांनो या’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बड़े अच्छे लगते है’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतही तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती. मात्र, तब्येतीमुळे तिला ही मालिका सोडावी लागली. तिचा शेवटचा सोशल मीडिया अपडेट ११ ऑगस्ट २०२४ रोजीचा होता, ज्यामध्ये तिने पती शंतनू मोघेसोबतचा फोटो शेअर केला होता.

प्रियाच्या अचानक झालेल्या जाण्याने सर्वच कलाकार भावुक झाले आहेत. त्यातच अभिनेता Abhijeet Khandkekar याने तिच्या आठवणीत मन हेलावून टाकणारी पोस्ट शेअर केली आहे. प्रिया आणि अभिजीत यांनी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्या सहवासाच्या आणि मैत्रीच्या आठवणींना उजाळा देताना Abhijeet Khandkekar लिहितो –

> “नावाप्रमाणेच सगळ्यांना प्रिय असलेली प्रिया… अजूनही विश्वास बसत नाहीये की तू आमच्यात नाहीस. श्रद्धांजली, अकाली एक्झिट अशा शब्दांचा तुझ्या संदर्भात वापर करणं मनाला पटत नाही. आयुष्य भरभरून जगणारी तू, शेवटच्या दोन वर्षांत काय सहन केलंस हे कल्पनाही करवत नाही. शंतनू, तू ज्या धीराने तिच्यासोबत होतास, त्याला खरंच तोड नाही…”

Abhijeet Khandkekar पुढे लिहितो, “लवकर बरी होशील, आणि आपण एकत्र पार्टी करू अशी आम्ही दिलेली आश्वासने शेवटी निरर्थक ठरली. आता तू नसल्याची सवय करून घ्यावी लागणार आहे. खरंच प्रिया, तू अजून हवी होतीस.”

या पोस्टमधून Abhijeet Khandkekar ची प्रिया मराठेबद्दलची जिव्हाळ्याची भावना स्पष्ट दिसून येते. तिच्या जाण्याने त्याच्यासह संपूर्ण मराठी मनोरंजन क्षेत्राने एक मनस्वी, उत्साही आणि बहुगुणी अभिनेत्री गमावली आहे.

हे पण वाचा.. ‘ठरलं तर मग’ फेम Jui Gadkari ची नवी सुरुवात; सेटवरून करत आहे मास्टर्स इन एंटरप्रेन्युरशिपचा अभ्यास

प्रियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास, तिने २०१२ मध्ये अभिनेता शंतनू मोघेशी विवाह केला होता. दोघांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत एकत्र कामही केलं होतं. तिच्या आयुष्यातील शेवटच्या टप्प्यात शंतनूने तिला दिलेली साथ सर्वांनाच भावली.

आज प्रिया मराठे नसली, तरी तिच्या आठवणी, तिची कामं आणि तिच्या जिद्दीची कहाणी कायम स्मरणात राहणार आहे. अभिजीत खांडकेकरसारख्या सहकलाकारांच्या भावुक पोस्टमुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि नात्यांच्या दृढतेचं दर्शन पुन्हा एकदा घडतं.

हे पण वाचा.. प्रियाच्या आठवणीत Shweta Pendse भावुक; “अनेकांना कल्पनाही नव्हती ती आजारी आहे” असं म्हणत केली मोठी पोस्ट

Abhijeet Khandkekar इंस्टाग्राम पोस्ट..