गणेशोत्सवाबरोबरच महाराष्ट्रात गौरीपूजनालाही विशेष महत्त्व आहे. घराघरांत श्रद्धा, आनंद आणि परंपरांचा संगम दिसतो. विशेषत: कोकणात या सणाचं वेगळंच स्थान असून इथे “आली गवर आली, सोनपावली आली” या पारंपरिक जयघोषासह गौराईचं स्वागत केलं जातं. या संस्कृतीचा अनुभव यंदा पहिल्यांदाच अभिनेत्री अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) हिने घेतला. लग्नानंतरचं तिचं पहिलं गौरीपूजन तिने कोकणातील पारंपरिक पद्धतीने पार पाडलं आणि त्याचा सुंदर व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला.
गौरीपूजन हा महिलांसाठी खास मानला जाणारा सण आहे. यातली महत्त्वाची प्रथा म्हणजे ओवसा. नववधूसाठी पहिला ओवसा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या प्रथेनुसार सुपांत पाच प्रकारच्या भाज्या, फळं, वेलींची पानं, करंडा फणी आणि ओटी ठेवली जाते. नवविवाहित स्त्रिया अनवाणी चालत डोक्यावर ही सुपे घेऊन गौरीसमोर जातात. Ankita Walawalkar नेही आपल्या पहिल्या गौरीपूजनात ही परंपरा पाळली. या खास क्षणी तिच्या सोबत पती कुणाल आणि सासूबाई उपस्थित होते.
या विधीच्या वेळी Ankita Walawalkar ने परंपरागत साडी परिधान केली होती. तिच्या या पारंपरिक लूकवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. “ही खरी आपली संस्कृती”, “अप्रतिम दिसतेस अंकिता”, “नजर काढ” अशा कमेंट्स सोशल मीडियावर तिच्या व्हिडीओवर पाहायला मिळतात. कोकणातील परंपरा जपत पहिलं गौरीपूजन पार पाडणाऱ्या अंकिता वालावलकरचं कौतुक केवळ चाहत्यांनीच नव्हे तर नेटकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणावर केलं आहे.
यंदा Ankita Walawalkar आणि तिचा पती कुणाल यांनी दोन्हीकडे—देवबाग (माहेर) आणि अलिबाग (सासर) येथे गणेशोत्सवाची सेवा केली. याशिवाय या दाम्पत्याने मुंबईत चिंचपोकळीच्या चिंतामणीचंही दर्शन घेतलं. अशा रीतीनं Ankita Walawalkar चा पहिला गणेशोत्सव आणि पहिलं गौरीपूजन खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरलं आहे.
कोकणातील परंपरा जपत केलेल्या या विधीने केवळ Ankita Walawalkar चाच नव्हे तर तिच्या संपूर्ण कुटुंबाचाही आनंद द्विगुणित केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचलेला हा खास क्षण आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
हे पण वाचा.. शर्मिष्ठा राऊतची लेक ‘रुंजी’ पहिल्यांदाच चाहत्यांसमोर; नावामागचं खास कारण उलगडलं









