मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या लावणी नृत्याने आणि दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी मेघा घाडगे (Megha Ghadge) अलीकडेच एका खास मुलाखतीत सहभागी झाली होती. या वेळी तिने आपल्या करिअरवर गंभीर परिणाम करणाऱ्या एका घटनेचा पर्दाफाश केला. इंडस्ट्रीतील दोन अभिनेत्रींकडून तिला झालेल्या त्रासाबद्दल Megha Ghadge ने मनमोकळेपणाने सांगितलं.
Megha Ghadge ने स्पष्ट केलं की एका कोरियोग्राफर आणि त्याच्या असिस्टंटला तिने काही काळ घरात राहण्याची परवानगी दिली होती. तो मुलगा वयाने खूप लहान होता आणि त्याच्याशी तिचं नातं फक्त कामापुरतंच होतं. त्या काळात ती एका रिलेशनशिपमध्ये होती, मात्र त्याबद्दल तिने सार्वजनिकरित्या कधीच बोललं नव्हतं. दरम्यान, इंग्रजी भाषेच्या अडचणीमुळे झालेला गैरसमज तिच्यासाठी मोठं संकट ठरला. टीममधल्या एका व्यक्तीने “क्रश” या शब्दाचा गैरअर्थ काढून तिच्या नावाशी अफवा जोडल्या आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यावर बोट ठेवायला सुरुवात केली.
या अफवांमुळे इंडस्ट्रीतील एका ग्रुपवर चर्चा रंगली. Megha Ghadge ने सांगितलं की त्या चर्चेत दोन अभिनेत्री सतत सक्रिय होत्या आणि त्या इतक्या अतिरेकाने बोलू लागल्या की, “तिला मारा, तिचे कपडे काढा…” अशा टोकाच्या कमेंट्सपर्यंत गोष्ट गेली. “त्या दोघींना माझ्याशी काही संबंध नव्हता, तरीही त्यांनी माझ्यावर घाणेरडं टीकास्त्र सोडलं. माझ्या बाबतीत जे काही लिहिलं जात होतं त्याचा माझ्या करिअरवर थेट परिणाम झाला,” असं Megha Ghadge भावनिक होत म्हणाली.
या अनुभवामुळे Megha Ghadge डिप्रेशनमध्ये गेली होती. ती म्हणाली की, “मी कधीच इतरांच्या गुपितांचा गैरवापर केला नाही, म्हणून माझं तोंड बंद राहिलं. पण जे घडलं त्याचा मानसिक आणि व्यावसायिक जीवनावर खोलवर परिणाम झाला. आजही मला वाटतं, त्या दोघींना मी थेट सामोरं जाऊन जाब का नाही विचारला.”
हे पण वाचा.. बाप्पाला निरोप देताना भावूक झाली Shreya Bugde; सोशल मीडियावर शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट
Megha Ghadge ही ‘माहेरची माया’, ‘परतु’, ‘चल धर पकड’, ‘नवरा माझा भवरा’, ‘चालू द्या तुमचं’, ‘पोपट’ अशा अनेक मराठी चित्रपटांत झळकली आहे. लावणी नृत्यांगना म्हणून तिची स्वतंत्र ओळख असून तिच्या जोशपूर्ण परफॉर्मन्समुळे ती प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून आहे. पण इंडस्ट्रीतील कटू अनुभवांनी तिच्या कारकिर्दीला धक्का बसल्याचं तिने या मुलाखतीत सांगितलं.
Megha Ghadge च्या या धक्कादायक कबुलीजबाबामुळे मराठी मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा “अफवा आणि गॉसिपमुळे कलाकारांच्या जीवनावर होणारे परिणाम” या विषयावर चर्चा सुरू झाली आहे.
हे पण वाचा.. क्रिकेटपटूंना देतो फिटनेसचे धडे, पण आहे मुरांबा’ फेम Kaajal Kate या’ मराठी अभिनेत्रीचा नवरा









