मनोरंजनसृष्टीतून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिचं ३१ ऑगस्ट रोजी पहाटे निधन झालं. काही वर्षांपूर्वी कॅन्सरवर मात केलेल्या प्रियाची तब्येत पुन्हा खालावली आणि अखेर या कठीण आजाराशी लढताना ती हरली. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी मालिकांमध्येही आपला ठसा उमटवणाऱ्या या कलाकारिणीच्या जाण्याने चाहत्यांपासून सहकलाकारांपर्यंत सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
‘पवित्र रिश्ता’ या गाजलेल्या मालिकेत प्रियाने अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ची बहीण साकारली होती. या मालिकेमुळेच दोघींमध्ये खास मैत्री जुळली. प्रियाच्या निधनानंतर तिच्या अंत्यदर्शनाला प्रार्थना बेहेरे उपस्थित राहिली होती. तर आज मालिकेची मुख्य अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Ankita Lokhande ने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “प्रिया माझी ‘पवित्र रिश्ता’ मधली पहिली मैत्रीण होती. मी, प्रार्थना आणि प्रिया – आमची छोटी गँग होती. आम्ही सोबत असलो की खूप धमाल यायची. आम्ही एकमेकींना प्रेमाने ‘वेडे’ म्हणायचो. माझ्या चांगल्या-वाईट काळात ती माझ्यासोबत होती. दरवर्षी ती माझ्याकडे गौरी गणपतीला दर्शनाला यायची. यावर्षी तिच्या आत्म्यासाठी प्रार्थना करेन. माझी वेडे… तुझी खूप आठवण येतेय.”
Ankita Lokhande पुढे लिहिते, “प्रिया खूप स्ट्रॉंग होती. प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरी गेली. पण आज ती आमच्यात नाही, हे लिहितानाच मी मनाने कोसळतेय. तिच्या जाण्याने हे प्रकर्षाने जाणवलं की एखादी व्यक्ती हसतमुख असली तरी ती मनात काय वेदना लपवत असेल हे आपल्याला कळत नाही. म्हणून कायम लोकांशी प्रेमाने वागा. प्रिया, तू कायम आमच्या आठवणीत राहशील. जोपर्यंत पुन्हा भेट होत नाही, तोपर्यंत प्रत्येक क्षणासाठी तुझे आभार. ओम शांती.”
हे पण वाचा.. “कॅन्सरने शरीर झिजवलं, पण मन नाही…” Priya Marathe च्या निधनानंतर Prarthana Behere ची भावुक पोस्ट
Ankita Lokhande च्या या शब्दांतून तिच्या आणि Priya Marathe मधल्या नात्याचं मोल स्पष्ट दिसून येतं. चाहत्यांनीही या पोस्टवर प्रतिक्रिया देत प्रियांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान, ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत Priya Marathe च्या नवऱ्याच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता अनुराग शर्मा यानेही तिच्या आठवणींना उजाळा दिला. त्याने मालिकेतील फोटो शेअर करत लिहिलं, “मला विश्वास बसत नाहीये की इतकी सुंदर व्यक्ती, उत्तम कलाकार आणि चांगली मैत्रीण आपल्यात नाही. प्रियासोबतच्या प्रत्येक आठवणी मी नेहमी साजऱ्या करेन. तिचं हसू कधीच विसरता येणार नाही. देव तिच्या आत्म्याला शांती देवो.”
हे पण वाचा.. “गोष्ट अशी संपायला नको होती…” प्रिया मराठेच्या निधनानंतर Viju Mane ची डोळे पाणावणारी पोस्ट
Priya Maratheचं अकाली जाणं हे संपूर्ण कलाविश्वासाठी मोठं नुकसान आहे. तिच्या आठवणी मात्र चाहत्यांच्या आणि सहकलाकारांच्या मनात कायम जिवंत राहतील.









