मराठी तसेच हिंदी मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) यांचं निधन झाल्याने कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. केवळ ३८ व्या वर्षी कॅन्सरसारख्या आजाराशी लढा देत तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या जाण्याने प्रेक्षकांसह तिच्या सहकलाकारांनाही मोठा धक्का बसला आहे. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील तिची सहकलाकार आणि जिवलग मैत्रीण असलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) हिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहून प्रियाला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Prarthana Behere ने आपल्या इंस्टाग्रामवर प्रियाPriya Marathe चे काही खास फोटो शेअर केले आहेत. त्यासोबतच तिने त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे भावनिक शब्द लिहिले आहेत. “ए वेडे प्रिया, पियू, परी, प्री… ती माझ्यासाठी फक्त सहकलाकार नव्हती, तर माझ्या आयुष्यातील अतिशय जवळची मैत्रीण होती. आम्ही एकत्र राहिलो, तासन्तास बोललो, साध्या मॅगीपासून ते कॉफीपर्यंत सगळं जग आमचं होतं. तिच्या सोबतीत घालवलेले क्षण हे आयुष्यातील अनमोल आठवणी आहेत,” असं तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं.
Prarthana Behere ने पुढे म्हटलं की, “ती माझ्या इंडस्ट्रीतील पहिली खरी मैत्रीण होती. अभिनयाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा सगळं नवं-नवं वाटायचं, तेव्हा तिचं हास्य, तिचं प्रेमळ बळ माझ्यासाठी उभं राहिलं. तिच्यासोबत मी पहिला सीन केला, पहिल्यांदा कॅमेरा शेअर केला. ती अत्यंत हसमुख, प्रामाणिक आणि भावनाशील होती. तिच्यासोबतचे क्षण हे आयुष्यभर लक्षात राहतील.”
हे पण वाचा.. “गोष्ट अशी संपायला नको होती…” प्रिया मराठेच्या निधनानंतर Viju Mane ची डोळे पाणावणारी पोस्ट
Priya Marathe च्या आजारपणाच्या काळातील आठवणी शेअर करताना Prarthana Behere आणखी भावूक झाली. तिने लिहिलं, “कॅन्सरशी झुंज देत असताना तिची तब्येत थोडी सुधारली होती. तेव्हा ती माझ्या अलिबागच्या घरात आली होती. आम्ही तिघींनी मिळून सुंदर वेळ घालवला. तेव्हा तिने मला सांगितलं होतं – ‘तुझं घर, तुझं वातावरण, तुझे कुत्रे… हे सगळं मला बरे करतंय.’ कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण तिचा आत्मा, तिचं खंबीर मन कधीच हरलं नाही. शेवटपर्यंत तिने हसत जगायला आणि इतरांनाही आनंद द्यायला शिकवलं.”
Priya Marathe ही एक बहुमुखी अभिनेत्री होती. मराठी मालिकांबरोबरच तिने हिंदी मालिकांमध्येही काम करत स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं. तिच्या निधनामुळे मराठी तसेच हिंदी मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांसोबतच तिचे सहकलाकार अजूनही तिच्या हसऱ्या चेहऱ्याच्या आणि तिच्या जिव्हाळ्याच्या आठवणींमध्ये रमले आहेत.
हे पण वाचा..Priya Marathe चं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन; सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट चर्चेत









