ADVERTISEMENT

“प्रियाच्या जाण्याची वेळ नव्हती”… अभिनेत्री Usha Nadkarni च्या डोळ्यात अश्रू; आठवणी सांगताना भावुक प्रतिक्रिया

पवित्र रिश्ता मालिकेत प्रियासोबत काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या तिच्या अचानक झालेल्या निधनामुळे भावुक झाल्या. “ही तिच्या जाण्याची वेळ नव्हती,” असं सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले.
Usha Nadkarni


मराठी आणि हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली Priya Marathe अचानक आपल्यातून निघून गेली ही बाब कुणालाच पचवता येत नाहीये. मालिकेत तिच्यासोबत काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) या प्रियाच्या आठवणी सांगताना भावुक झाल्या आहेत.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना Usha Nadkarni म्हणाल्या, “प्रियाला कॅन्सर झाला होता हे मी ऐकलं होतं. एवढ्या कमी वयात असा आजार होणं हे ऐकून मला तिच्यासाठी खूप वाईट वाटलं होतं. ती उपचारानंतर बरीही झाली होती आणि पुन्हा कामाला सुरुवात केली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच तिची तब्येत बिघडल्याचं समजलं. आम्ही भेटायला जाण्याचा विचार केला होता, पण तिचे पती शंतनु मोघे यांनी येऊ नका असं सांगितलं. कदाचित किमोथेरपीमुळे तिचे केस गळाले असतील आणि त्यामुळे तिला कोणालाही भेटायची इच्छा नसावी. आम्ही ठरवूनही तिला भेटू शकलो नाही याचं दुःख आहे.”

नुकताच गणेशोत्सव सुरू झाल्याने प्रियाच्या अंत्यदर्शनाला जाणं शक्य नाही, असंही Usha Nadkarni म्हणाल्या. भावनांना वाट मोकळी करून देताना त्या पुढे म्हणाल्या, “देव इतका निष्ठुर कसा होऊ शकतो? ही तिच्या जाण्याची वेळ नव्हती. प्रिया खूपच गुणी आणि मनमिळाऊ होती. नेहमी हसत असे, सर्वांना आपलंसं करून घ्यायची. तिचं हे अचानक जाणं फारच असह्य आहे.”

Usha Nadkarni यांनी प्रियाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलताना म्हटलं, “काही वर्षांपूर्वीच तर तिचा संसार सुरू झाला होता. त्यांनी नवीन घर घेतलं होतं. तिच्या आयुष्याची सुरुवात अजून ताजीच होती. तिला मूल नव्हतं हे आता चांगलंच झालं असं म्हणावं लागेल, कारण नाहितर त्या लेकराचं काय झालं असतं हा प्रश्न मनाला सतावतो.”

हे पण वाचा.. पार्टीतील पहिली भेट ते लग्नापर्यंत; Priya Marathe आणि Shantanu Moghe ची अनोखी लव्हस्टोरी

पवित्र रिश्ता’ मालिकेत Priya Marathe ने साकारलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आजही आठवते. अंकिता लोखंडे, प्रार्थना बेहेरे आणि Usha Nadkarni यांच्यासोबत तिचा पडद्यावरचा प्रवास लक्षात राहणारा ठरला. तिच्या जाण्याने मालिकेतील सर्व सहकलाकारांना खोलवर धक्का बसला आहे.

मनमिळाऊ स्वभाव, अभिनयाची हातोटी आणि सकारात्मक दृष्टिकोन या गुणांमुळे प्रियाने अल्पावधीतच चाहत्यांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली होती. तिच्या जाण्याने एक गुणी अभिनेत्री आणि हसतमुख मैत्रीण कायमची हरपली, अशा भावना कलाविश्वातून व्यक्त होत आहेत.

हे पण वाचा.. Nikki Tamboli ला डेंग्यूची लागण; अभिनेत्रीची आरोग्याबाबतची पोस्ट व्हायरल