ADVERTISEMENT

“माझ्या डोक्यावरचं छप्पर हरवलं…” Tejaswini Pandit ने आई Jyoti Chandekar यांच्या वाढदिवशी लिहिली भावुक पोस्ट

लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आई ज्योती चांदेकर यांच्या वाढदिवशी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अचानक आईच्या निधनामुळे झालेल्या रिक्ततेबद्दल ती बोलली असून तिचे शब्द वाचून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
Tejaswini Pandit

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) गेल्या काही दिवसांपासून आईच्या निधनामुळे प्रचंड भावनिक अवस्थेत आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेत पूर्णाईच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर(Jyoti Chandekar) या तिच्या आई होत्या. केवळ ६९ व्या वर्षी त्यांचं अचानक निधन झाल्यानंतर तेजस्विनीच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. आज त्यांचा वाढदिवस असून, या निमित्ताने Tejaswini Pandit ने सोशल मीडियावर केलेली पोस्ट अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणणारी ठरली आहे.

Tejaswini Pandit नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. वैयक्तिक आयुष्यातील क्षण, तिच्या भावना किंवा तिच्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे ती चाहत्यांसोबत वाटून घेत असते. मात्र, यंदा आईच्या वाढदिवशी केलेली पोस्ट ही खूपच भावनिक आणि मनाला भिडणारी ठरली. “आई, अजूनही विश्वास बसत नाही की तू नाहीस. आपल्या बऱ्याच योजना अपुऱ्या राहून गेल्या. International Girls Trip राहिला, कथाचा वाढदिवस जोरदार साजरा करायचा होता, फार्महाऊसवर New Year साजरा करायचा होता आणि आज तुझ्या वाढदिवशीच पुस्तक प्रकाशन करायचं ठरवलं होतं. पण हे सगळं अपूर्णच राहिलं,” असे शब्द Tejaswini Pandit ने पोस्टमध्ये लिहिले.

आईच्या स्वभावाची आठवण काढताना Tejaswini Pandit पुढे म्हणते, “आई तू हट्टी होतीस. कित्येकदा तुला सांगितलं होतं की स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दे. पण तुझं जगणं हे केवळ कामाभोवतीच फिरत राहिलं. तू म्हणायचीस की काम करता करता मृत्यू यावा. कामाप्रती तुझी निष्ठा विलक्षण होती. तू खूप निग्रही, प्रामाणिक आणि मेहनती होतीस. आयुष्यभर खूप परिश्रम घेतलेस आणि आम्हाला वाढवलंस. पण, शरीर थकतं हे मान्य करायला हवं होतं. तीन दिवसांत सगळं बदलून गेलं आणि माझ्या डोक्यावरचं छप्पर हरवलं.”

या भावनिक पोस्टमध्ये Tejaswini Pandit ने तिच्या आईच्या अभिनय कारकिर्दीचाही गौरव केला आहे. “कलाकार म्हणून तू नेहमीच प्रेक्षकांच्या हृदयात होतीस, आहेस आणि कायम राहशील. तुझा भारदस्त आवाज आणि डोळ्यातली ताकद प्रेक्षकांना नेहमी मोहिनी घालत असे. कलाकार कधीच मरण पावत नाही; तो आपल्या कलाकृतीतून कायम जिवंत राहतो. त्यामुळे तू आमच्यात आहेसच,” असं ती म्हणाली.

हे पण वाचा.. लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe चं निधन; Subodh Bhave ने सोशल मीडिया पोस्टद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली

शेवटी आईच्या स्मृतींना उजाळा देताना ती म्हणाली, “तुझ्या अपूर्ण इच्छा मी आणि दीदी पूर्ण करू. तुझ्यावरचं पुस्तक मी नक्की पूर्ण करेन. तुझ्या प्रेरणादायी प्रवासाला शब्दरूप देईन. आता तरी तू विश्रांती घे आई. बाबावर करायचं राहिलेलं प्रेम करून घे. आम्हा दोघींवर आशीर्वाद ठेव. तू गेलीस, पण तुझं मार्गदर्शन आणि संस्कार आमच्या सोबत कायम असतील.”

Tejaswini Pandit ची ही पोस्ट वाचून अनेक चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी तिच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर तिच्या या शब्दांनी हजारो लोक भावूक झाले आहेत. आईचं अस्तित्व हरवणं ही मोठी वेदना आहे आणि तिच्या शब्दांमधून ती वेदना स्पष्ट जाणवते.

हे पण वाचा.. Priya Marathe च्या निधनाने मनोरंजनविश्वावर शोककळा; Prajakta Mali ला बसला मोठा धक्का

Tejaswini Pandit इंस्टाग्राम पोस्ट..