मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रावर आज शोककळा पसरली आहे. लहान पडद्यावर आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गुणी अभिनेत्री Priya Marathe यांचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देत असताना तिने आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनाची बातमी समजताच कलाविश्वासह प्रेक्षकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
Priya Marathe ही गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. मात्र प्रकृती सतत ढासळत गेल्याने आज पहाटे चारच्या सुमारास तिचं दुःखद निधन झालं. Priya Marathe फक्त मराठी टेलिव्हिजनपुरती मर्यादित नव्हती; तर हिंदी मालिकांमधूनही तिने लोकप्रियता मिळवली होती. तिचा अभिनय, तिचं गोड व्यक्तिमत्त्व आणि सहज संवादशैली यामुळे ती प्रेक्षकांची लाडकी झाली होती.
मराठी मालिकांमध्ये ‘तू तिथे मी’ आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या. हिंदी मालिकांमध्ये तिने ‘पवित्र रिश्ता’ या सुपरहिट मालिकेतून स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं. तिच्या व्यक्तिरेखा नेहमीच प्रेक्षकांच्या मनाला भिडल्या. लहानशा भूमिकेलाही ती आपला ठसा उमटवायची, हे तिचं वेगळेपण होतं.
Priya Marathe च्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. सहकलाकार, मित्र आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरून तिच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली आहे. केवळ कलाकार म्हणूनच नव्हे तर एक जिवलग मैत्रीण आणि आनंदी स्वभावाची व्यक्ती म्हणूनही तिला आठवलं जात आहे.
आज दुपारी चार वाजता मीरा रोड येथील हिंदू स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तिच्या जाण्याने केवळ मराठी नव्हे तर हिंदी प्रेक्षकांनाही मोठी पोकळी जाणवतेय. Priya Marathe वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी या तेजस्वी कलाकाराने दिलेला निरोप अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणणारा आहे.
Priya Marathe चं आयुष्य जरी अल्पावधीत थांबलं असलं, तरी तिच्या अभिनयाच्या आठवणी कायम जिवंत राहतील. तिचा पडद्यावरील गोड स्मितहास्य, तिची संवादकळा आणि तिचा सहजसुंदर अभिनय हेच तिच्या चाहत्यांसाठी अमूल्य ठेवा ठरणार आहेत.
हे पण वाचा.. Madhugandha Kulkarni झी मराठीवर कमबॅक; वकिलाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला









